आशाताई बच्छाव
लांजेडा, इंदिरानगर व रामनगर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
माजी नगरसेवक व भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आधुनिक काळ हे तंत्रज्ञानाचे काळ म्हणुन ओळखल्या जाते.पोळा हा बैलाचा सण म्हणुन ओळखला जात असला तरी बदलत्या परिस्थितीत बैल पोळ्यापेक्षा तान्हा पोळ्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.कोरोनाचा कालखंड सोडला तर मागील काही वर्षापासुन तान्हापोळा निमित्त नंदीबैल सजावट स्पर्धेसह बालकांच्या वेशभूषा यावरहि स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.
स्थानिक लांजेडा,इंदिरानगर व रामनगर येथे तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी लांजेडा वार्डातील शोर्य योगेश नैताम या बालकाला नंदीबैल उत्कृष्ट सजावट व झाकी मध्ये प्रथम पारितोषिक 5000/- रुपये व एक छोटी सायकल ,तर दुसरे बक्षीस 3000/-रुपये व तिसरे 2000/- तर सहभागी बालकांना उस्फुर्त बक्षिसे, बक्षीस रुपात माजी नगरसेवक तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले.
यावेळी लांजेडा येथिल कार्यक्रमात अनिल कुनघाडकर,मुक्तेश्वर काटवे,नरेंद्र भांडेकर, विक्की नैताम, तानाजी भुरसे,रुपम भांडेकर, महेश टिकले,तुकाराम नैताम, तुलाराम नैताम, हर्षल गेडाम, गणेश नैताम,बेबीताई चीचघरे, पर्यवेक्षक देवानंद कामडी उपस्थित होते.
तुकडोजी चौक रामगर येथे किसान आघाडी प्रदेश सदस्य रामेशजी भुरसे,अनिल पोहनकर, गुरुदेव सेवामंडळाचे ग्रामसेवाधिकारी,सुरेश मांडवगडे,सचिव कवडू येरमे,राजू शेरकी,कविता उरकुडे,पुनम हेमके,सुमंत चोपकर,मंदा मांडवगडे,सत्यविजय दुर्गे,सुरेश फुलबांधे,छाया श्रीपादवार.तर हनुमान मंदिर इंदिरा नगर येथील कार्यक्रमात राजू बोबाटे,राकेश नैताम,दिपक सोमनकर,पांडुरंग नैताम अरुणा भुरसे आदी उपस्थित होते.