Home पुणे गणपती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सुचना

गणपती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सुचना

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0083.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत नागणे यवत पोलीस स्टेशन आवारातील गणपती साध्या पद्धतीने साजरा करावा पोलीस निरीक्षक नारायण पवार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळ व पदाधिकाऱ्यांची बैठक यवत येथील समृद्धी गार्डन मंगल कार्यालय आयोजित केली होती यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक नारायण पवार साहेब बोलत होते परंतु या कार्यक्रमाला गावच्या पोलीस पाटलांना आमंत्रण असूनही त्यांनी पाठ फिरवल्याने पोलीस अधिकारी साहेबांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर पवार साहेबांनी मंडळांनी गणपती पारंपारिक पद्धतीने करावे यामध्ये पारंपारिक वाद्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण आरोग्य शिबिर यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असे ते म्हणाले त्याच बरोबर ग्रामसुरक्षा दल व तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी तरुणांनी प्रयत्न करावेत असे मत पवार साहेबांनी व्यक्त केले यापुढे बोलताना पवार साहेब म्हणाले मंडळांनी गणपती स्टेज सुस्थितीत उभारणे लाइटिंग ची व्यवस्था करताना शॉर्टसर्किट होणार नाही याची काळजी घेणे त्याचबरोबर ठरवून दिलेल्या दिवशी स्पीकर्स चालू ठेवू नये गणपती साठी परवानगी घेणे गरजेचे आहे त्यासाठी सर्व मंडळांनी अर्ज करून परवानगी घ्यावी विना परवानगी असलेल्या मंडळावर कारवाई होऊ शकते मंडळांचे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक असून वर्गणी ही त्यांच्या इच्छेने घ्यावी जबरदस्ती करू नये विसर्जन मिरवणूक नेहमीच्या मार्गाने हवी यामध्ये गटबाजी होऊन वाद होणार नाही याची काळजी घ्यावी दरम्यान विसर्जन वेळी स्थळी लाईटची व्यवस्था सेफ्टी जॅकेट सह आवश्यक ती खबरदारी घ्यावी डीजे वापरला पूर्णपणे बंदी असून डीजे चा वापर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल डीजे ऐवजी दोन स्पीकर्स बँजो पारंपारिक वाद्य यांचा वापर करावा यावर्षी एक गाव एक गणपती करणाऱ्या गावास बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल यावेळी उपनिरीक्षक केशव वाबळे सर पद्मराज गंपले पोलीस पाटील आणि मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleजिंतूर तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा
Next articleसंग्रामपूर पंचायत समिती कारभारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले ग्रामसेवक तूपाशी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here