Home बुलढाणा संग्रामपूर पंचायत समिती कारभारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले...

संग्रामपूर पंचायत समिती कारभारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले ग्रामसेवक तूपाशी

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0077.jpg

संग्रामपूर पंचायत समिती कारभारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले ग्रामसेवक तूपाशी

युवा मराठा वेब न्यूज पोर्टल प्रतिनिधी- रवी शिरस्कार, संग्रामपुर

संग्रामपूर पंचायत समितीत न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या नागरिकांची पंचायत समिती प्रशासनाकडून गोची करण्यात येत आहे. चौकशीच्या नावाखाली प्रकरणे दडपण्याचा सोयीस्कर मार्ग अवलंबत तक्रारींना केराची टोपली दाखविण्याचे प्रकार येथे सुरू असल्याचा आरोप आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने सुद्धा संग्रामपूर पंचायत समितीच्या तक्रारींकडे कायम दुर्लक्ष केल्याने अधिकारी कर्मचारी “सर्व ओके” मध्ये आहेत. वरवट खंडेराव येथील संतोष गाडकर यांनी येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशीसाठी १४ ऑगस्टला उपोषण केले. उपोषण कर्ते अचानक बेपत्ता झाल्याने प्रशासकीय यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अखेर त्यांचा शोध लागला.
१५ ऑगस्टला बूलढाणा येथे जिल्हा परिषद समोर कोद्री येथील श्रीराम खोंड यांनी गटविकास अधिकारी व चार ग्रामसेवकांवर कारवाईसाठी उपोषण केले. जिल्हा प्रशासनाने चौकशीचे लेखी आश्वासन देत वेळ मारून नेली. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीने कागदी घोडे नाचून चौकशीच्या नावाखाली ग्रामसेवकांना जणु अभय दिला असल्याचे चित्र दिसत आहे. दि.१४ फेब्रुवारीला पळसोडा ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीसाठी चार सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली होती. मात्र या चौकशी समितीने ६ महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा अहवाल सादर केला नाही. तसेच लाडणापुर ग्रामपंचायतीची खातेनिहाय चौकशीसाठी २९ जूनला तीन सदस्यीय समिती गठीत केली. ही समिती सुद्धा कागदावरच असून दिड महिन्यांपासून समितीकडून चौकशी तर सोडा ग्रामपंचायतीला साधी भेटही दिली नसल्याचा आरोप आहे.
काकनवाडा येथील ग्रामपंचायत मध्ये लाखो रूपयांची अफरातफर प्रकरणी आरोप करत गावाच्या सरपंच यांच्या समवेत गावातील शेकडो नागरिक पंचायत समिती संग्रामपूर येथे विस्तार अधिकारी डाबेराव यांनी गावाच्या विकास कामात ढवळाढवळ करून घरकुल प्र पत्र ड च्या ७० पैकी २५ घरकुल रद्द करण्याचा आरोप करून गावकऱ्यांच्या इतर अश्या अनेक अडचणीच्या समस्या निवेदनात नमुद करुन गावातील अनेक समस्यांचा आरोप केला. दुसऱ्या दिवशी गावात भेटी करीता आलेल्या बिडीओं यांनी काकंनवाडा येथे भेट देऊन विस्तार अधिकारी यांना काही दिवसातच बडतर्फ करण्यात येणार…. अशी नोटीस बजावून वेळ मारून नेली. तसेच पाच महिन्यापासून गटविकास अधिकारी चौकशी समित्या गठीत प्रकरणे थंड बस्त्यात टाकत असल्याचा सुद्धा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
अर्थ चक्र फिरत असल्याने वरिष्ठ जिल्हा निहाय अधिकाऱ्यांनी संग्रामपूर पंचायत समितीकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष तर् केले नाही ना? असा आरोप-प्रत्यारोप करून तालुक्यात सर्वीकडून अनेक ठिकाणी चर्चा रंगत आहे
तरी सलाईन वर असलेल्या संग्रामपुर पंचायत समिती मार्फत होणाऱ्या गावच्या विकास कामांना नव-संजीवनी देण्याचे काम वरिष्ठांकडून होईल का ?
याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.

Previous articleगणपती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सुचना
Next articleठेकेदाराने लावला महावितरणला 25 लाखाच्या चुना ?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here