Home विदर्भ कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा

कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा

101
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा
गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):दि.25/01/2022 ला प्रजास्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला शिवसेना गडचिरोली शहराच्या वतीने कोरोना काळात अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यांनी अदभूतपुर्व कामगीरी केल्याबद्दल त्यांना भेट वस्तु तसेच सन्मानपञ देण्यात आले व त्यांच्या गौरव करण्यात आले.
ना भूतो ना भविष्यात आलेल्या या कोरोणारुपी संकटात रक्ताचे नाते दुर होते, पण या काळात अंगणवाळी सेविका, मदतनीस,व आशा सेविका यांनी घराघरात जावुन परजिल्हातुन आलेल्या तसेच oxygen पातळी मोजणे असो की लसीकरणा विषयी असो असे अनेक कामे उत्तम प्रकारे आपली कामगीरी केल्याबदल मा.ना.एकनाथजी शिंदे पालकमंञी गडचीरोली यांच्या आदेशाने तसेच तसेच किरण पांडव व किशोर पोद्दार यांच्या मार्गदर्शनात व शीवसेणा शहरप्रमुख रामकिरीत यादव व डॉ.अश्विनी यादव यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम शहराच्या मध्यभागी असलेल्या पटेल मंगल कार्यालयात घेण्यात आला.
या वेळेस काही अंगणवाळी सेविका तसेच मदतनीस यांनी आपले मनोगत वेक्त करतांना भावुक झाल्या व शिवसेणेचे आभार तसेच यादव दामत्यांचे आभार मानले त्या मनाल्यात कि एवढ कोरोणाच्या काळात काम केले तेव्हा कुणीच आमच्या कार्याची जाणीव ठेवले नाहीत पण आज हा संमान्न करुन मान मिळवुन दिल्या बंदल आभार मानले व या सत्काराचा मनापासुन स्विकारतो असेही असे त्यांनी मटले यावेळेस गडचिरोली शहरातील प्रत्येक अंगणवाळीतील सेविका मदतनीस व आशा वर्कर उपस्थित होत्या यावेळेस कार्यक्रमाचे संचालण विधानसभा संघटक शीवसेणा नंदुभाऊ कुंमरे प्रास्थाविक डॉ.अश्विनी यादव, उपजिल्हा प्रमुख राजुभाऊ कावळे,जिल्हाप्रमुख वासुदेव शेळमाके,पप्पी पठान,अमीत यासलवार,चामोशी तालुका प्रमुख तसेच नवनाथ उके युवासेणा प्रमुख बारसागडे,तसेच शुषमा राऊत जयसिंगपुरे ,प्रिया रामावत,निकिता रामावत,विशाल,अनिकेत,नईम शेख,अरविंद साखरे,आकाश सुमंतावार व अनेक शीवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here