Home विदर्भ माजी जि.प. सदस्य नत्थूजी कापसे यांच्या प्रयत्नाला यशअनसिंग येथे नवीन पाणी पुरवठा...

माजी जि.प. सदस्य नत्थूजी कापसे यांच्या प्रयत्नाला यशअनसिंग येथे नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ५९लाख ८४हजार रूपयाचा निधी मंजूर आता अनसिंग वासीयांना नियमित व शुद्ध पाणी पुरवठा होणार

365
0

राजेंद्र पाटील राऊत

माजी जि.प. सदस्य नत्थूजी कापसे यांच्या प्रयत्नाला यशअनसिंग येथे नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी ५९लाख ८४हजार रूपयाचा निधी मंजूर
आता अनसिंग वासीयांना नियमित व शुद्ध पाणी पुरवठा होणार
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-अनसिंग येथील वाढती लोकसंख्येचा विचार करून अनसिंग गावातील सर्व प्रभागामध्ये नियमित व शुद्ध पाणी पुरवठा या उदात्त हेतूने माजी जि.प.सदस्य नत्थूजी कापसे यांनी २०१४ मध्येच अनसिंग येथे नवीन पाणी पुरवठा योजना करण्याबाबत वाशीम जि.प.मध्ये ठराव घेतला.तसेच अनसिंग ग्रामपंचायतने २०१४मध्येच याबाबतचा ठराव घेतला होता.यायोजनेच्या पुर्ततेसाठी नत्थूजी कापसे यांनी वाशीमपासुन मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. एक वर्षापूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत अनसिंगच्या निवडणूमध्ये अनसिंग येथील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याबाबतचे आश्वासन नत्थूजी कापसे यांनी जनतेला दिले होते.
२५जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयानूसार अनसिंग येथे जल जीवन मिशन अंतर्गत नविनपाणी पुरवठायोजनेसाठी शासनाने १३कोटी ५९लाख ८४ हजार रूपये मंजूर केल्याची घोषणा कूली आहे.
माजी जि.प. सदस्य नत्थूजी कापसे यांनी अनसिंगवासीयांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता कूल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन कण्यात आले.अनसिंग येथील नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी सरपंच संतोष खंदारे, उपसरपंच अय्यूब पठाण, माजी सरपंच चिंतामण लांडगे, जगदीश राजे, इम्रान कुरेशी, शेख जलीलभाई, खुर्शीदभाई, किशोर सारडा, रामेश्वर (पमू) गोरे, बंडु वाखेडे
कुंडलिक ढगे, चाँदुभाई, अन्सार, संतोष ठाकरे, गजानन कड,सचिव बोडखे सर्व सदस्य मंडळी आणि अनसिंग ग्रामपंचायतीच्या कर्मचा—यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleसोमपूर येथे टंट्यामामा भील जयंतीनिमित्त आरटीओ साहेबांच्या हस्ते प्रतिमा पुजन
Next articleकोरोना योद्ध्यांचा सत्कार सोहळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here