Home विदर्भ मुख्याधिकाऱ्याच्या बदलीसाठी काँग्रेस अध्यक्षांचे उपोषण.शेगाव तहसील समोर आमरण उपोषणास सुरु…

मुख्याधिकाऱ्याच्या बदलीसाठी काँग्रेस अध्यक्षांचे उपोषण.शेगाव तहसील समोर आमरण उपोषणास सुरु…

194
0

राजेंद्र पाटील राऊत

मुख्याधिकाऱ्याच्या बदलीसाठी काँग्रेस अध्यक्षांचे उपोषण.शेगाव तहसील समोर आमरण उपोषणास सुरु…
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा

भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना झालेल्या अनियमिततेमुळे मध्ये मुख्याधिकार्‍यांनी त्यांना साथ दिली. त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्याधिकारी भाजपाला मदत करू शकतात हे कारण देत मुख्य अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे अशी मागणी करीत शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी आज पासून शेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मागील दोन महिन्यांपासून रेटून धरलेल्या मागणीला काँग्रेस पक्ष सत्तेत असताना सुद्धा एका साध्या अधिकार्‍याची बदली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेवर मागील पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती अशा वेळेस सत्ताकाळ संपत असताना काँग्रेस कमिटीचे शेगाव शहर अध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या विरोधात बंड पुकारला आहे. त्यांच्या आरोपानुसार मुख्याधिकारी शेळके हे भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालेल्या अनियमिततेमध्ये सहभागी होते. त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये ते भारतीय जनता पार्टीला मदत करू शकतात त्यामुळे त्यांची बदली किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी मागील दोन महिन्यांपासून देशमुख हे सातत्याने करीत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला शासनाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. राज्यात महा विकास आघाडीची सत्ता असताना आणि पालकमंत्री संपर्कमंत्री आमदार खासदार हे सर्व लोकप्रतिनिधी महा विकास आघाडीचे असतानासुद्धा देशमुख यांच्या मागणीला यश मिळत नसल्याने मागणी मध्ये कुठे पाणी मिळते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आज सोमवार पासून मागणीला यश मिळाले नसल्याने किरणबापू देशमुख यांनी तहसील कार्यालयासमोर मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

Previous articleविद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारावर शासनाने दुर्लक्ष करू नये.
Next articleअवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here