Home विदर्भ अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा

111
0

राजेंद्र पाटील राऊत

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा

भारतीय जनता पार्टी. गडचिरोली तालुक्याच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आमदार डॉ देवरावजी होळी यांचे निवेदकाना आश्वासन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान केलेले असून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची घोषणा करावी अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टी गडचिरोली तालुक्याच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना देण्यात आले.
यावेळी भाजपा तालुक्याच्या वतीने तालुका संपर्क प्रमुख विलासजी भांडेकर, तालुका महामंत्री लोमेशभाऊ कोलते,मन की बात कार्यक्रमाचे गडचिरोली विधानसभा संयोजक बंडूभाऊ झाडे, ,तालुका उपाध्यक्ष पांडुरंगजी भांडेकर, देवानंदजी चलाख, भाजपा नेते झरकरजी, भाजपा ओबीसी युवा नेते रुपेश चूधरी यांनी निवेदन दिले.

या वर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरी स्वभावामुळे अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. सातत्याने अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना देण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी शेतकऱ्यांना न्याय् देण्यासाठी मंत्री स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यात येईल असे आश्‍वासन निवेदकाना दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here