Home Breaking News प्लास्टीकच्या राष्ट्रध्वज वापरास गृहविभागा कडुन प्रतिबंध –

प्लास्टीकच्या राष्ट्रध्वज वापरास गृहविभागा कडुन प्रतिबंध –

127
0

प्लास्टीकच्या राष्ट्रध्वज वापरास गृहविभागा कडुन प्रतिबंध –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि. १४ – भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ता‍क दिन व अन्य राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने अलिकडच्या काळात प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरल्याने हा एक प्रकारे ध्वज संहितेचा अवमान आहे. राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय ध्वज संहितेचे काटेकोर पालन करणे सर्वांसाठी बंधन कारक आहे. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यास प्रतिबंध असून नागरिकांनी याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे गृह विभागाने परिपत्रक काढून नागरिकांना आवाहन केले आहे.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरुन ते रस्त्यावर इतरत्र पडल्याने तो राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्रत्येक नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान हा राखला जाणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापरा बाबत निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रध्वज संहितेच्या कलम 2.2 मधील प्रयोजनासाठी कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर कोणीही करु नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर हा करायचा झालाच तर ध्वजसंहितेच्या तरतुदी मध्ये नमूद केल्या नुसारच करावा, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सर्व स्तरावर याबाबत जनजागृती केली जात असून त्यात पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. महानगर पालिका आयुक्त,जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी / माध्यधमिक/ प्राथमिक आदि कार्यालयांचा समावेश आहे.

Previous article*कोरोना योद्धांचा भादोले गावांत* *आमदारांच्या हस्ते सत्कार*
Next article⭕मुबंई गणेश विसर्जनानंतर महा विकास आघाडीचे सरकार चे हि विसर्जन⭕
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here