• Home
  • *कोरोना योद्धांचा भादोले गावांत* *आमदारांच्या हस्ते सत्कार*

*कोरोना योद्धांचा भादोले गावांत* *आमदारांच्या हस्ते सत्कार*

*कोरोना योद्धांचा भादोले गावांत* *आमदारांच्या हस्ते सत्कार*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या कोरोना रोगाशी दोन हात करणेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी हे आपल्या जिवाची बाजी लावून कोरोनावर मात करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या कामामुळेच आज ग्रामीण भागात कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाला रोखण्यात आपण यशस्वी झालो असुन अजुनही कोरोनाशी सामना करणेसाठी सज्ज असनारे अशा या कोरोना योद्धांचा भादोले गावात सत्कार करताना मला अतिशय अभिमान वाटला. असे उदगार हातकणंगले तालुक्याचे *आमदार* *राजुबाबा आवळे* यांनी काढले. ही लढाई अजूनही संपलेली नसुन , आपल्या सगळ्यांना पुढेही एकजूटीने कोरोनाचा सामना करायचा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्मचारी, गावकऱ्यांना उपाययोजनाबाबत मार्गदर्शन, सूचना कराव्यात आम्ही आपल्यासोबत आहोत. कोरोनाकाळात लढत असलेल्या या कोरोना योद्धांची सरकार योग्य दखल घेईल. असा *आमदार राजूबाबा आवळे* यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी भादोले येथे सत्कार समांरभावेळी सरपंच आनंदा कोळी, उपसरपंच सुजाता नांगरे, धोंडीराम पाटील भैया, आनंदराव यादव सरकार, मोहन घाग सर, संभाजीराव घोरपडे, दिलीप पाटील, विजय पाटील, दिपक पाटील, सचिव संपत पाटील,अभिजित पाटील, कपिल पाटील, विकास सेवा संस्थेचे पदाधिकारी, भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर , ग्रामस्थ सोशल डिस्टन्सिंग राखत उपस्थित होते. यावेळी रेशन धान्य दुकानातून धान्याचे वितरण देखील करण्यात आले.

anews Banner

Leave A Comment