आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय
‘नमन एज्युकेशन सोसायटी संचलित लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, व रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगांव यांच्या संयुक्त विदयामांनाने दहीहंडी उत्सव, साजरा
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगांव शहरातील नावाजलेले, स्कूल म्हणजे
नमन एज्युकेशन सोसायटीचे , स्कूल विद्यार्थी व, अध्यक्ष . संजय बागुल, उपाध्यक्षा,सरिता बागुल ,तसेच कार्यक्रमाचे, प्रमुख पाहुणे , यांच्या उपस्थित अमित पटेल (सी. ई. ओ ऑफ अभिनव
फाऊंडेशन येवला), श्री. बबनराव साळे, (माजी विस्तार अधिकारी . सुरेश नारायणे गणतंत्र चे संपादक लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर व रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी , या सर्वांनी सरस्वती मातेचे पूजन करून, *संगणक कक्षाचे* उद्घाटन,प्रा, सुरेश नारायणे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थी आज राधा आणि कृष्णाची वेशभूषा परिधान करून आले होते. त्यानंतर राधा आणि नटखट कृष्णाच्या परिचयाने कार्यक्रमास जोरदार सुरुवात झाली.यानंतर मुलांनी कृष्ण जन्मला गितावर ताल धरत नृत्याविष्कार केला. मुलांचे नृत्याविष्कार पाहून त्यांना सुरेश नारायणे 1000 रू., श्री. सागर गायकवाड , दिलीप सोलंकी यांनी बक्षीस देऊन गौरविले. अमित पटेल यांनी आपल्या अभिनव फाउंडेशन ची माहिती देऊन त्याचे महत्त्व सांगितले. तसेच मागील वर्षात (2022-23) ऑलिम्पियाड परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यात मास्टर संचित संजय बागुल, मास्टर अर्णव प्रमोद आढाव, मिस आराध्या आशिष लोढा या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. या विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी कृष्णजन्मावर आधारित छोटीशी नाटिका सादर केली.आणि फटाक्यांची आतिषबाजी करत कृष्णजन्म उत्सव साजरा करण्यात आला. आणि लगेचच मान्यवरांच्या हस्ते श्री बालकृष्णाची आरती करण्यात आली. आणि नंतर गोविंदा आला रे आला या गीतावर ताल धरत दहीहंडी फोडण्यात आली श्री. संजय बागुल सर आणि सौ.सरिता बागुल यांच्यातर्फे मदतनीसांच्या मदतीने सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीमती.अनिता जगधने आणि जयश्री चौधरी यांनी केले.श्रीमती विजेता पिलके मॅम यांनी जन्माष्टमी बद्दल माहिती सांगितली. श्रीमती वर्षा नगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.आणि वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यात लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले , नूतन खैरनार , प्रतिभा अहिरे ,पूनम सोमासे ,धनश्री न्याहारकर , सुरेखा गायकवाड , नेहा पाटील , ज्योती सुरसे , संदीप पांडे ,राहुल उपाध्याय ,मोहन सुरसे तसेच
रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका रूपाली शिंदे , एडना फर्नांडिस , मोनाली गायकवाड , सुषमा बावणे , रोहिणी पांडे , चैताली अहिरे तसेच ,क्रीडा शिक्षक मयुरी खैरनार ,आणि मदतनीस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पाटील यांनी आतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम छान प्रकारे पार पडला.