Home बुलढाणा गावाकडील पांडव नदीत 15 वर्षीय मुलाचा नदीतील खड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

गावाकडील पांडव नदीत 15 वर्षीय मुलाचा नदीतील खड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0013.jpg

गावाकडील पांडव नदीत 15 वर्षीय मुलाचा नदीतील खड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी रवी शिरस्कार संग्रामपूर.
संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव गावाला लागुन असलेल्या पांडव नदीमध्ये आज दिनांक १८ ऑगेस्ट रोजी आंघोळ करायला गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा नदीतील जेसीबी साह्याने केलेल्या खड्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
घटनेतील सविस्तर असे की, काथरगाव येथील रहिवासी मुलगा रोहित नागेश खंडेराव वय वर्षे १५, हा सकाळी दिनांक १८ ऑगस्ट रोजी शेतीमध्ये मजुरी काम करायला गेला होता. शेतातून परत येताना दुपारी सुमारे तीन च्या दरम्यान नदीमध्ये त्याला गावातील काही मुले पोहताना दिसली. रोहित त्या मुलांजवळ गेला आणि मुलासोबत चर्चा करत बसला म्हणे…..
.….आज मी १८० रु कमावले आज मी मनसोक्त कचोऱ्या खाणार……
असे तो उत्स्फूर्तपणे मुलांसोबत बोलला.
पण मात्र त्याचे हे शब्द अखेरचेच ठरले जेव्हा तो नदीत आंघोळ करायला गेला होता तेव्हा,त्याला पोहता येत नसल्यामुळे मागच्या वर्षी नदीमध्ये जेसीबी च्या साहाय्याने करण्यात आलेल्या भल्या मोठया खड्डात त्याचा पाय घसरून तो पडला असता वाचवा!वाचवा !
या आकांताने ओरडला पण मात्र आपला जीव वाचवणे त्याला शक्य झाले नाही.अशी माहिती ग्रामीण रुग्णालयात आलेल्या गावातील नागरिकांनी दिली आहे.

ग्रामीण रुग्णालयात रोहित ला आणले असता डॉक्टरांनी त्याला लगेच मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलीस हेड कॉन्सटेबल कैलाश मेश्रे तसेच पोलिस कॉन्सटेबल रवि चुंगडा
यांनी घटनेचा पंचनामा करून सदर बॉडी ला शवविच्छेदन करीता पाठवत असल्याची माहिती माहिती डॉ. हेमंत काटकर यांनी दिली.

Previous articleविधीमंडळाच्या कामकाजावर विरोधकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन
Next articleहरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी निमित्याने रेखेगांव/अनंतपुर येथे विविध कार्यक्रम आयोजित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here