Home गडचिरोली हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी निमित्याने रेखेगांव/अनंतपुर येथे विविध कार्यक्रम...

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी निमित्याने रेखेगांव/अनंतपुर येथे विविध कार्यक्रम आयोजित

174

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0017.jpg

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी निमित्याने रेखेगांव/अनंतपुर येथे विविध कार्यक्रम आयोजित

या विविध कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक खा.अशोकजी नेते

रेखेगांव/अनंतपूर,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ गडचिरोली)

चामोर्शी:-सामकी माता विद्या.विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्याने रेखेगांव/अनंतपुर येथे विद्यार्थ्यांना टॅबचे व शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना खासदार अशोकजी नेते यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना विद्यार्थ्याने जीवनामध्ये तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजल्या पाहिजे जसे की विद्यार्थ्यांमध्ये दूरदृष्टी, कोणत्याही कामाबद्दलची एकाग्रता, (लगन) आत्मविश्वास, सहनशीलता या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी पाडल्या पाहिजे.असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.
तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन प्रत्येक व्यक्तीने एकतरी वृक्ष लावला पाहिजे. वृक्षाची संवर्धन करणे ही एक काळाची गरज आहे.असे याप्रसंगी सुद्धा बोलल्या गेले.
मान्यवरांचे शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी अर्जुनवार यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगीे सामकी माता विघा.विकास मंडळाचे संस्थाध्यक्ष मा.श्री.जि.एस.चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी खा.अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,डॉ. कुंभारे साहेब,प्रकाशजी अर्जुनवार सामाजिक कार्यकर्ते,संस्थाध्यक्ष जि.एस चव्हाण,मनोहर हेपट साहेब, गौराबाई गावडे सरपंच,कुंदाताई सातपुते ग्रा.पं सदस्या,देवसिंगजी,तसेच प्राध्यापक, शिक्षकवृंद विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Previous articleगावाकडील पांडव नदीत 15 वर्षीय मुलाचा नदीतील खड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Next articleचामोर्शी येथील परिसरातील युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या. खा.अशोकजी नेते.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.