Home गडचिरोली चामोर्शी येथील परिसरातील युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या. खा.अशोकजी नेते.

चामोर्शी येथील परिसरातील युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या. खा.अशोकजी नेते.

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0018.jpg

चामोर्शी येथील परिसरातील युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या.
खा.अशोकजी नेते.

चामोर्शी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चामोर्शी येथील परिसरात युवकांना कीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी तोडासे साहेब यांची प्रत्यक्ष युवकांसोबत बैठक घेऊन या आठ दिवसांमध्ये क्रीडांगण उपलब्ध करून द्या असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी दिले. वाढत्या वसाहतीमुळे चामोर्शी येथील छोटे- मोठे ग्राऊंड लुप्त होत चालले आहेत, त्यामुळे येथील युवा वर्ग नगरपंचायत आठवडी बाजाराच्या जागेवर क्रिकेट खेळतात, परंतु नगरपंचायतेतील कर्मचारी या खेळणाऱ्या मुलास त्या जागेवर खेळण्यास मनाई करतात. आणि काही युवा वर्ग पोलीस भरतीच्या तयारी करिता आष्टी रोड, घोट रोड, गडचिरोली रोडला धावायला व व्यायाम करायला जात असतात. पण या सर्व रोडला मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी चालू असल्याने छोटे मोठे अपघात होत असतात, स्थानिक मुलांना क्रीडांगणाच्या अभावी दुसऱ्या शहरात जाऊन पोलिस भरतीची तयारी करावी लागते, त्यामुळे युवकांना क्रीडांगण हि एक दैनंदिन जीवनातील एक मुलभूत गरज आहे. परंतु तालुक्याच्या ठिकाणी क्रीडांगण नसेन हि खूप मोठी शोकांतिका आहे.त्याकरीता चामोर्शी शहरात क्रीडांगणास जागा उपलब्ध करून द्यावे.याकरिता युवकांनी या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांना हि बाब सांगितल्यावर उपविभागीय अधिकारी यांची बैठक घेऊन या आठ दिवसात युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी दिले.
या प्रसंगी खा.अशोकजी नेते. प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,रमेशजी बारसागडे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष,स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य,प्रकाशजी अर्जुनवार सामाजिक कार्यकर्ते,भास्करजी बुरे ओबिसी मोर्चाचे सरचिटणीस उपविभागीय अधिकारी तोडासे साहेब,थानेदार शेवाळे साहेब तथा अधिकारी,कार्यकर्ते व अनेक युवकवर्ग उपस्थित होते

Previous articleहरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची पुण्यतिथी निमित्याने रेखेगांव/अनंतपुर येथे विविध कार्यक्रम आयोजित
Next articleसावकारवाडीत मनसेचे शाखा उदघाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here