Home बुलढाणा अखेर चौथ्या दिवशी रस्ता मोकळा करून तामगाव ग्रामस्थांचे उपोषणाची सांगता..!

अखेर चौथ्या दिवशी रस्ता मोकळा करून तामगाव ग्रामस्थांचे उपोषणाची सांगता..!

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0020.jpg

अखेर चौथ्या दिवशी रस्ता मोकळा करून तामगाव ग्रामस्थांचे उपोषणाची सांगता..!

युवा मराठा न्युज वेब पोर्टल (ता.प्र.:- रवि शिरस्कार संग्रामपूर)

तालुक्यातील तामगाव येथील ग्रामस्थांनी जाण्या येण्यासाठी बंद केलेला रस्ता मोकळा करून द्या, या मागणीसाठी दि.१ /ऑगस्ट२०२२ रोजी संग्रामपूर तहसील कार्यालय समोर तामगाव येथील महिला व पुरुषांनी आमरण उपोषण सुरू केले होते.अखेर आज दि. 4 / ऑगस्ट रोजी चौथ्या दिवशी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्याने अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात येवून उपोषणाची सांगता करण्यात आली.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की,संग्रामपूर तालुक्यातील
तामगांव शिवारातील गट नं. 25, 24, 23 मधील जाण्या- येण्याचा वही वाटीचे रस्त्यात लोखंडी अँगल लावून सदर रस्ता बंद करण्यात आल्यामुळे याच रस्त्यावरून अकृषक प्लॉट पडलेले असून गांवातील बऱ्याच नागरिकांनी त्या भागात घरे बांधून राहत आहेत. रस्ता बंद करण्यात आल्यामुळे जाण्या -येण्याचा रस्ताच उपलब्ध राहीला नाही. त्याकरिता
दि.१/ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय समोर तामगाव ग्रामस्थासह महिलांनी आमरण उपोषण सुरू केले होते. सतत तीन दिवस विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते , संबंधित अधिकारी यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न करुनही उपयोग झाला नाही. अखेर आज दि.4/आॕगष्ट रोजी चौथ्या दिवशी ग्रामस्थ व ग्रामपंचायतचे सहका-याने सामज्यांची भुमिका घेवून रस्यातील केलेले अतिक्रमण लोखंडी अँगल काढून रस्ता मोकळा करून तामगाव ग्रामपंचायतचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य व सचिव यांनी लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यात आले.पत्रात नमूद आहे की, रत्यावरील लोखंडी अँगल दि.3 ऑगस्ट रोजी काढण्यात येऊन जाण्या येण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे ,तरी रस्ता संदर्भात नियमानुसार कायदेशीर प्रकिया पूर्ण होईपर्यंत सदर रस्त्यावर कोणी अडथळा व अतिक्रम केल्यास ग्रा.प.तामगाव वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन खाली रस्ता मोकळा करण्याची प्रकिया पूर्ण करेल असे स्वाक्षरीचे पत्रात नमूद आहे. उपोषण कर्ते यांना पत्र व चहा देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी .ह्यावेळी नायब तहसिलदार व्हि.एस.चव्हाण संग्रामपूर पं.स.चे प्रभारी ,सहा. गटविकास अधिकारी जिवन भिलावेकर,ग्रा.प.सचिव,सरपंच, उपसरपंच, सदस्य तलाठी विनोद भिसे,सह ग्रामस्थ व गावातील राजकीय पदाधिकारी , जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, दयालसिंग चल्हाण,राजेःद्र ससाने नागरिक उपस्थित होते .

Previous articleभोकरच्या लामाकानीत वृक्षारोपण संपन्न
Next articleराष्ट्रीय उत्सव पर्वात सगळ्यांनी सहभागी व्हावे! जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here