Home मुंबई विधीमंडळाच्या कामकाजावर विरोधकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन

विधीमंडळाच्या कामकाजावर विरोधकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन

181

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0046.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: सलग दुसऱ्या दिवशीही विधिमंडळाच्या कामकाजावर विरोधकांचे आंदोलन सुरूच! सलग दुसऱ्या दिवशीही विधिमंडळाच्या कामकाजावर आंदोलकांनी बहिष्कार घातला . विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षाने आंदोलन सुरू केले .विविध मागणीसाठी हे आंदोलन विरोधकांनी सुरू केले. त्यामध्ये ईडी सरकार हाय हाय अशा घोषणाही त्यांनी दिल्या ५० खोके सारे काही ओके अशा घोषणाही त्यांनी दिल्या. विधी मंडळाचे कामकाज मध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी त्यांनी मागणी केली. मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता हा मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा ही हा आमदार चौधरी यांनी विधिमंडळामध्ये मांडला . सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी विरोधकांनी ही आंदोलन पायऱ्यावर सुरू केले असल्याने विधिमंडळाचे पुढील कामकाज स्थगित करावे लागले. सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय विधिमंडळाचे कामकाज होऊ देणार नाही असेही विरोधकांनी या ठिकाणी ठणकावून सांगितले.

Previous articleअफगाणिस्तानच्या काबूली शहरात मस्जीदमध्ये भीषण स्फोट
Next articleगावाकडील पांडव नदीत 15 वर्षीय मुलाचा नदीतील खड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.