Home Breaking News स्वातंत्रदिनी लाल किल्यावर स्वदेशी होवित्जर तोफ धडाडणार; २१ तोफांची सलामी

स्वातंत्रदिनी लाल किल्यावर स्वदेशी होवित्जर तोफ धडाडणार; २१ तोफांची सलामी

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0042.jpg

स्वातंत्रदिनी लाल किल्यावर स्वदेशी होवित्जर तोफ धडाडणार; २१ तोफांची सलामी                              दिल्ली,(युवा मराठा न्युज नेटवर्क)

देश यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. ७५ वर्षानिमित्त या वर्षी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवस समारोहात २१ तोफांची सलामी देण्यासाठी सरकार की ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत स्वदेशी होवित्जर तोफ आणि एडवांस्ड टॉड आर्टिलरी गन सिस्टम (एटीएजीएस) यांच्या प्रोटोटाइपचा वापर सलामी देण्यासाठी करणार आहेत. या तोफांमुळे भारताच्या वाढलेल्या क्षमतांचे प्रदर्शन होणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने या वर्षी अनेक नव्या संकल्पना अमलात आणल्या जाणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या ब्रिटिश कालीन तोफांएवजी डीआरडीओने बनवलेल्या पूर्णपणे स्वदेशी असलेल्या एटीएजीएस या तोफांद्वारे यावर्षी लाल किल्यावर २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे.

या संदर्भात पीटीआईने दिलेल्या वृत्तानुसार संरक्षण मंत्रालयाला या स्वदेशी तोफांचा वापर करून भारताच्या वाढलेल्या क्षमतांचे प्रदर्शन करणे हा यामागचा उद्देश आहे.

Previous articleइंदवटी शाळेच्या आदित्य माने याचा सत्कार
Next articleबिबट्या तस्करी प्रकरणी आरोपींकडून बंदुकीसह १४ नखे, दातासह अन्य साहित्य जप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here