Home रत्नागिरी इंदवटी शाळेच्या आदित्य माने याचा सत्कार

इंदवटी शाळेच्या आदित्य माने याचा सत्कार

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0046.jpg

इंदवटी शाळेच्या आदित्य माने याचा सत्कार              रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

लांजा तालुक्यातील जि. प. पू. प्रा. शाळा क्रमांक १ इंदवटी प्रशालेचा विद्यार्थी आदित्य प्रकाश माने या विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल त्याचे व त्याच्या आई-वडिलांचे शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

शालेय उपक्रमांमध्ये नेहमी पुढाकार घेऊन यश प्राप्त करणाऱ्या आदित्य प्रकाश माने याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल शाळेतील शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आधिपत्य व त्याचे आई-वडील यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला मार्गदर्शक शिक्षिका सौ. मासाळ शांता मासाळ, मुख्याध्यापक सौ. मेघा मयेकर, सहकारी शिक्षक गजेंद्र पांढरे, विश्वजित कांबळे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दत्ताराम पाटील आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here