आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: महाराष्ट्रामध्ये येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा! महाराष्ट्र मध्ये जुलै महिन्यामध्ये सतत पाऊस पडत असल्याकारणाने हवामान खात्याने येथे ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईमध्ये आज येलो अलर्ट जाहीर केला आहे. रायगड ,रत्नागिरीला रेड अलर्ट दिला आहे. विदर्भ आणि कोकणामध्ये सुद्धा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे .भंडारा,गोंदिया मध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. कोल्हापुरात सतत पाऊस पडत असल्याने पावसाचा वेग कायम आहे त्यामुळे शिवाजी विद्यालयाच्या परीक्षा दोन दिवस पुढे ढकलण्यात आले आहेत. कोल्हापुरातली पंचगंगा नदी भरून वाहत आहे. नागपूर शहराच्या भोवती फिरणारी नाग नदीला सुद्धा विकराल रूप धारण केले आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतरकेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रामध्ये १ जून पासून आतापर्यंतच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे ११९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस होत असल्याकारणाने येत्या ४८ तासांमध्ये सर्वांनी काळजी घेण्यासाठी सावध राहने गरजेचे आहे.