Home पुणे धक्कादायक ! पुण्यात भर शाळेच्या आवारात स्कूल बस पेटली; मोठी दुर्घटना टळली

धक्कादायक ! पुण्यात भर शाळेच्या आवारात स्कूल बस पेटली; मोठी दुर्घटना टळली

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0020.jpg

धक्कादायक ! पुण्यात भर शाळेच्या आवारात स्कूल बस पेटली; मोठी दुर्घटना टळली                             पुणे,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

पुण्यातील हडपसर भागात एंजल मिकी मिनी स्कुल आहे. या शाळेच्या आवारात ही बस उभी होती. दरम्यान, काल शाळेला सुट्टी होती. यावेळी अचानक बसमधून धूर येऊ लागला आणि यानंतर बसमधून अचानक आगीचे लोण बाहेर येऊ लागले. अचानक लागलेल्या या आगीमुळे शाळा प्रशासनाची धावपळ उडाली. मात्र शाळेला सुट्टी असल्याने बसमध्ये व जवळपास विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन केंद्राचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.

बसच्या अंतर्गत भागात शॅार्ट सर्किंट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात, मात्र या आगीमागचे कारण समजू शकले नाही. या शाळेत रोज अनेक विद्यार्थी हे स्कूल बसने येत असतात. काल मोहरम असल्याने शाळेला सुट्टी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Previous articleमहाराष्ट्रात येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस ;सावधानतेचा इशारा
Next article“हर घर तिरंगा” उपक्रमाअंतर्गत भाजपच्यावतीने बाईक रॅली संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here