Home नांदेड राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना 2023...

राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना 2023 24 अंतर्गत मौजे पार्डी या गावात कार्यशाळा संपन्न

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0069.jpg

राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना 2023 24 अंतर्गत मौजे पार्डी या गावात कार्यशाळा संपन्न
मुदखेड,(शिवानंद पवार तालुका प्रतिनिधी)- मौजे पार्डी वैजापूर तालुका मुदखेड या गावी कार्यशाळेची आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी श्री दत्तकुमार कळसाईत साहेब व मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर माणिकराव कल्याणकर साहेब वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पोखरणी तसेच तालुका कृषी अधिकारी डॉक्टर अमरज्योती गच्चे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद पाटील पवार हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना सोयाबीन पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे मार्गदर्शन व किडी रोगाबद्दल माहिती देऊन पिकाची फेरपालट करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी श्री कळसाईत साहेब यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक श्री कल्याणकर साहेबांनी सद्यस्थितीत पिकावर होत असलेल्या बुरशीजन्य रोग व मुळकुज बाबत करावयाचे उपायोजना व पुढे होणारे दुष्परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन केले. व तालुका कृषी अधिकारी श्री गच्चे मॅडम यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व आधार शेडिंग याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केली या कार्यक्रमासाठी गावातील उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता. न्यूज न्यूज चैनल चे प्रतिनिधी अमोल टेकले सर न्यूज चैनल चे प्रतिनिधी शिवानंद पाटील पवार कृषी विभागाचे मंडळ अधिकारी हिलालपुरे सर पोकराचे प्रकल्प सहाय्यक दिक्कतवार सर कृषी सहाय्यक श्री क मोरे सर श्रीमती एचडी रेशमलवाड मॅडम ज्योती रवाळ मॅडम शिल्पा शिंदे राजकुमारी देशमुख सोनाली पाटील व समूह सहाय्यक श्री शरद कोळी हे हजर होते सूत्रसंचालन श्री रामकिशन धुमाळे यांनी केली तर आभार प्रदर्शन त्या गावचे कृषी सहाय्यक श्री पाकलवार सर यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here