Home पालघर महा आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न.

महा आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न.

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220727-WA0017.jpg

महा आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न.              पालघर,(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)पालघर जिल्हा व मॅजिक डील ग्रुप ऑफ कंपनी वन रुपी क्लिनिक यांच्या वतीने डॉ. आंबेडकर नगर,पालघर(पूर्व) येथे मोफत महाआरोग्य,व नेत्र तपासणी शिबीर संपन्न

रविवार दि.२४ रोजी रिपाई(आ) व मॅजिक डील ग्रुप ऑफ कंपनी वन रुपी क्लिनिक यांच्या वतीने डॉ. आंबेडकर नगर,पालघर ( पूर्व) येथील समाजमंदिर हॉल मध्ये मोफत महाआरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीर पार पडले.सदर शिबिराचे उद्घाटन पालघर येथील कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आयु.भीमसेन गायकवाड साहेब यांच्या हस्ते झाले.महामानवांच्या प्रतिमेचे पुजन,सामुदायिक बुद्धवंदना घेऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत व मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिबिराला जवळपासच्या परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दाखवून शिबिराचा लाभ घेतला. या वेळी बऱ्याच गरीब गरजू नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून चष्मे देण्यात आले.तसेच मोफत ईसीजी,शुगर(random), बॉडी मास इंडेक्स( बीएमआय) ,इतर तपासण्या करून मोफत औषधे देण्यात आली यावेळी डॉ.राहुल घुले (ceo magic dil group of company) ,डॉ.रुचा भोईर, डॉ. संदीप गुप्ता ,प्रा.भूषण भोईर, पूजा जाधव(सिस्टर), दिव्या खेडेकर(सिस्टर) ,श्वेता पाटील(सिस्टर) ,प्रतिमा गुप्ता,मंगेश जाधव,मनिष गुप्ता असा मोठ्या प्रमाणात स्टाफ उपलब्ध होता. त्यांनी आलेल्या सर्व नागरिकांना मोफत आरोग्यसेवा देण्याचे बहुमूल्य काम केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय सुरेश जाधव (जिल्हा अध्यक्ष -पालघर(रिपाई) आ.) यांच्या आदेशानुसार व उपस्थितीत आयु.शरद जाधव(युवा अध्यक्ष पा.ता.) अँड. निखिल राऊत,आयु.राम ठाकूर (उपाध्यक्ष पा .शहर) यांनी केले
यावेळी डॉ.आंबेडकर नगर (पूर्व) येथील जेष्ठ समाजसेवक आयु.पंढरीनाथ गायकवाड,आयु संध्याताई राऊत (महिला उपाध्यक्षा पा.जि.) आयु. कुंदन मोरे(उपाध्यक्ष पा.जि.)आयु.पुष्पराज फुलारा ( संघटक पा . जि.) आयु.सुनिल जाधव (अध्यक्ष डॉ.आंबेडकर नगर विकास समिती) ,आयु.मंगेश उईके( जिल्हा सचिव पालघर पोलीस बॉईज संघटना ) इतर कार्यकर्ते ,ग्रामस्थ , मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here