आशाताई बच्छाव
जिंतूर तालुक्यातील वृक्षलागवडीचा लाखांचा खर्च गेला खड्डयात
विष्णु डाखुरे (तालुका प्रतिनिधी )
जिंतूर: तालुक्यात वनविभाग, सामाजिक वनीकरणविभागासह अनेक कार्यालयांनी वृक्षलागवडीसाठी लाखो रुपयांचा खर्च करून वृक्षलागवड केली.परंतु गेल्या वर्षीचे बोटावर मोजण्याइतकेही वृक्ष जिवंत नसल्याने या लागवडीवर केलेला खर्च खड्डयात गेल्याचे चित्र आहे.
जिंतूर तालुक्यातील २०२०-२१ मध्ये सामाजिक वनीकरण व वनविभागामार्फत तसेच अनेक कार्यालयांमार्फत
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते उद्दिष्ट गाठण्यासाठी अनेक कार्यालयाने खड्डे खोदून वृक्षलागवड केली. परंतू या वृक्षलागवडीकडे सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या वतीने वृक्ष जगविण्याच्या नावाखाली वृक्षलागवड नसलेल्या ठिकाणी उन्हात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांना चुना लावण् यात येत आहे. यावर्षी सुद्धा सामाजिक वनीकरण व वन विभागामार्फत वृक्ष लागवड होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतू, मोठा गाजावाजा करत वृक्षलागवड करण्यात येते. त्या वृक्षांची काळजी मात्र कागदावरच घेतली जात असल्याचे समोर आले आहे. वृक्षलागवडीचे जिंतूर तालुक्यात नुसते खड्डे दिसत आहेत.