Home वाशिम मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदीसाठी मालेगाव तहसील समोर आमरण उपोषण सुरू.

मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदीसाठी मालेगाव तहसील समोर आमरण उपोषण सुरू.

303

आशाताई बच्छाव

1001485052.jpg

मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदीसाठी मालेगाव तहसील समोर आमरण उपोषण सुरू.

दोन दिवस साखळी व नंतर आमरण उपोषण.

मालेगांव/वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ:- मुंगळा गावात अवैध दारू विक्रीने कहर केला असून दारूपायी अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. नवीन पिढीतील मुले दारूच्या आहारी जात अनेक कुटुंबांचे घर उध्वस्त झाले असुन महिलाचा संयम आता संपत आला आहे. अनेक वर्षापासून अवैध देशी, गावठी दारू बंद करण्याच्या मागणीनंतरही अवैध देशी गावठी दारू खुलेआम सुरू आहे दारू विक्रीवर आळा बसलेला नाही. यामुळे श्री संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंचचे संयोजक अनंता कुटे, व महिला मंडळी कडुन आज रोजी मालेगाव तहसील समोर उपोषण सुरू..

सविस्तर वृत्त असे की मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी साठी लढा उभारलेला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला अनेक निवेदन दिली आहेत. मात्र पोलिसांनी त्यांच्या निवेदनालां केराच्या टोपलीत टाकल्याने अवैध दारू विक्री झपाट्याने वाढली आहे. अवैध दारू विक्रीच्या विरोधात संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंचच्या वतीने प्रशासनाला 30 एप्रिल पर्यंत अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र पोलिसाच्या शून्य कार्यवाहीने अखेर संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंचने ८ मे रोजी मालेगाव तहसील समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मुंगळा गावात 100% कायमस्वरूपी त्वरित दारूबंदी लागू करावी. दारूबंदी प्रतिबंधक कायद्यानुसार मुंगळा गावाचा समावेश करावा. आदि मागण्यासाठी८ मे पासून रखरखत्या उन्हात शांततेत मालेगाव तहसील समोर उपोषण सुरू .८व ९ रोजी साखळी उपोषण राहिल नतंर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील. उपोषणाची त्वरित दखल प्रशासनाने घेतली नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन उभारण्यात येईल. आसी प्रतिक्रिया श्रीसंत गाडगेबाबा व्यासनमुक्ती विचार मंच मुंगळाचे संयोजक अनंता कुटे यांनी मांडली आहे..‌यावेळी भागवत मापारी व्हाॅइस आफ मिडिया वाशीम जिल्हा. उध्दवराव घोडे शिवशेना तालुका प्रमुख.विजय शेंडगे ,अनिल बळी, मुख्य संपादक, उज्वल मालेगाव.अजय चोथमल, उपसंपादक उज्वल मालेगाव,सुनील इंगळे, प्रफुल्ल साठे, अजिंक्य साठे,मेडशी, संदिप इंगोले, चंद्रकांत गायकवाड, नागेश अवचार पत्रकार, गणेश गणेश काटकर,लक्ष्मीबाई घुगे, प्रयागबाई राऊत विश्रांतीबाई जायभाये आशा खासभागे, जिजाबाई कदम, सुनिता कुटे, सुभद्राबाई खोटे, कमलबाई राजेकर, जिजाबाई कदम, व इतर बहुसंख्य मंडळी हजर होती…

Previous articleचोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 1,18,600 किमतीचा गांजा जप्त.
Next articleअमरावती मेळघाटात परतवाडा धारणी खंडवा मार्गावर अवध्या२४.तासात तीन अपघात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.