Home भंडारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त

173

आशाताई बच्छाव

1001484315.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त

भव्य राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षेचे आयोजन 18 मे 2025 ला अड्याळ येथे

शाळेतून दहावी व बारावी मध्ये प्रथम येणाऱ्यांचा सुद्धा सत्कार व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सुद्धा सत्कार होणार

संजीव भांबोरे
भंडारा_प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 18 मे 2025 ला भव्य राज्यस्तरीय ऑफलाइन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा परीक्षा वर्ग 8 ते वर्ग पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेली 15 मे 2025 पर्यंत नाव नोंदणीची तारीख ठरविण्यात आलेली असून परीक्षा शुल्क 20 रुपये ठेवण्यात आलेली आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न स्वरूपाची 1 तासाची 100 मार्कची असेल. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास परीक्षा दोन टप्प्यात त्याच दिवशी घेण्यात येईल. तसे विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल. प्रथम बक्षीस 1001 रुपये ,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ ठेवण्यात आलेले आहे. द्वितीय बक्षीस 701 रुपये सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र , पुष्पगुच्छ ठेवण्यात आलेले आहे. तृतीय बक्षीस 501 रुपये , सन्मानचिन्ह , सन्मान प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून 25 मे 2025 ला निकाल घोषित करण्यात येईल. व 9 जून 2025 ला दुपारी 3 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. त्याचप्रमाणे शाळेतून दहावी मध्ये व बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार व विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल. ऑनलाइन नाव नोंदणी करिता पंकज वानखेडे तसेच प्रत्यक्षात आपला नाव नोंदणी करिता संजय वंजारी ओ एस एस कॉम्पुटर इन्स्टिट्यूट अड्याळ येथे भेट द्यावी.
तसेच दहावी बारावी मध्ये शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याने पत्रकार संजीव भांबोरे 70 66 37 0489 संपर्क साधावे.

Previous articleतहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
Next articleशेत-पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्तीसाठी “सस्ती अदालती” चे शुक्रवार 9 मे रोजी आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.