Home नाशिक मल्हार हिल कॅम्पसचे दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयास निवड.

मल्हार हिल कॅम्पसचे दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयास निवड.

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220712-WA0029.jpg

मल्हार हिल कॅम्पसचे दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयास निवड.

संदिप गांगुडेॅ (पिंगळवाडे)

भाक्षी (ता.बागलाण) येथील श्री खंडेराव महाराजांच्या गड पायथ्याशी असलेल्या आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलीत मल्हार हिल कँम्पस मधील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. संस्थेने नवोदय परीक्षेतील उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीतर्फे घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत मल्हार हिल विद्यालयाच्या समीर विकास ठाकरे व कल्पेश योगेश चौरे या दोन विद्यार्थ्यांनी परीक्षेत उज्वल यश मिळवत ग्रामीण भागाचा नावलौकिक वाढवला आहे. विरगावपाडे (ता.बागलाण) येथील अत्यंत गोरगरीब कुटुंबातून आलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रतिकूल आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीवर मात करीत वर्षभर जोमाने अभ्यास केला. दोघा विद्यार्थ्यांचे पालक अशिक्षित असून आपल्या मुलांनी भरपूर शिकावे आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावे असे स्वप्न त्यांच्या पालकांनी बघितले. या विद्यार्थ्यांनी वर्षभर कोणतीही शिकवणी न लावता शाळेतील अभ्यासाच्या बळावर हे यश मिळवले आहे. याकामी मुख्याध्यापक पंकज दात्रे, अमोल गातवे, रोहिणी सूर्यवंशी, स्वाती दातरे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, शाळा विकास अधिकारी सुरेश येवला, बिंदु शर्मा, कल्पना येवला, नंदकिशोर शेवाळे, किरण सोनवणे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व पालकांचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर सोळूंके, सारिका शिंदे, स्नेहल वाघ, पवन नाडेकर, सुजाता पाटील, गोकुळ दातरे, शेखर अहिरे, हर्षाली मोरे, पुनम जाधव, सिंधू पवार, जयश्री देवरे, सुजाता गुंजाळ, वृषाली जाधव, दादाजी माळी, रोहिणी सोनवणे, निर्मला रौंदळ, जागृती नहिरे, रोहिणी सूर्यवंशी, सविता जाधव, सविता अहिरे, गायत्री देवरे, सुजाता पाटील, उषा रौंदळ, तेजस्विनी निकम, किरण मोरे, साहेबराव खैरनार, सजन देवरे, किरण पवार, आबा शिंदे, रेखा आहिरे, कल्याणी गायकवाड आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here