Home नांदेड शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहोचला

शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहोचला

113

आशाताई बच्छाव

IMG-20220712-WA0028.jpg

शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहोचला

▪️पाण्याची आवक व पाऊस लक्षात घेता एक दरवाजा उघडला
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात आज 80 टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. व बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग-377 क्युमेक्स (13313.00 क्युसेस) दुपारी 2.30 वाजता उघडण्यात आला आहे.

विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे,‍ जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे.

बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले

गोदावरी नदीमध्ये पाण्याचा येवा वाढल्यामुळे व शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आल्यामुळे बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे दोन दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या खालील बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या / शेतकऱ्यांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Previous articleमल्हार हिल कॅम्पसचे दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयास निवड.
Next articleजिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 22.20 मि.मी. पाऊस.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.