Home Breaking News सरकारवरचा माझा विश्वासच उडाला ! सामूहीक बलात्कार प्रकरणी बिल्कीस बानोनं मौन सोडलं…

सरकारवरचा माझा विश्वासच उडाला ! सामूहीक बलात्कार प्रकरणी बिल्कीस बानोनं मौन सोडलं…

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0029.jpg

सरकारवरचा माझा विश्वासच उडाला ! सामूहीक बलात्कार प्रकरणी बिल्कीस बानोनं मौन सोडलं…       राजकोट,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज गुजरात )

सामूहिक बलात्कार व त्यानंतर हत्या प्रकरणातील दोषींच्या मुक्ततेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना सरकारच्या निर्णयाचा निषेध करत बिल्किस बानोने म्हटले आहे की, या कृतीने न्यायवरचा माझा विश्वासच उडाला आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी दिलेल्या निकालाने माझ्यावर मागच्या २० वर्षातील दु:ख पुन्हा कोसळलं आहे. जेव्हा मी ऐकले की, ज्या ११ आरोपींनी माझे संपूर्ण जीवन उध्वस्त केले, माझ्या डोळ्यासमोर माझ्या संपूर्ण कुटूंबाला संपवले, माझ्या ३ वर्षाच्या मुलीला माझ्यापासून हिरावून घेतले. ते सर्व आरोपी मुक्त करण्यात आले आहेत. आता ते खुलेआम फिरणार आहेत. यावर काय बोलावे यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी सुन्न आणि शांत झाले आहे.

दोषींच्या मुक्ततेवर बोलताना बिल्किस यांनी म्हटले की, मला देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर विश्वास होता. मला देशातील सिस्टमवर विश्वास होता. त्यामुळे मी इतक्या मोठ्या आघातानंतरही मी आयुष्य जगत होते. इतका मोठा व अन्यायकारक निर्णय घेण्यापूर्वी कोणीही माझी सुरक्षा आणि न्यायाविषयी विचार केला नाही. मी गुजरात सरकारला आवाहन करते की, कृपा करून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. मला भयमुक्त व शांतीपूर्ण पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार परत करा. माझ्या व माझ्या कुटूंबाची सुरक्षा निश्चित करा.

३ मार्च २००२ रोजी गोध्रा कांडनंतर उसळलेल्या दंगलीत दाहोद जिल्ह्यातील लिमखेड़ा तालुक्यामधील रंधिकपूर गावात जमावाने बिल्किस बानो कुटूंबावर हल्ला केला होता. बिल्किस त्यावेळी पाच महिन्याची गर्भवती होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला व तिच्या कुटूंबातील सात जणांची हत्या करण्यात आली. तर सहा जण सदस्य पळून गेल्यामुळे बचावले. या प्रकरणी आरोपींना २००४ मध्ये अटक करण्यात आली होती.

Previous articleप्रत्येक तरूण आत्मनिर्भर झाला तर भारत आत्मनिर्भर होईल- कौस्तुभ फाटक
Next articleरत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे अमृत महोत्सवांतर्गत चोरीतील जप्त मुद्देमालाचे मूळ मालकांना वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here