Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे अमृत महोत्सवांतर्गत चोरीतील जप्त मुद्देमालाचे मूळ मालकांना वाटप

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे अमृत महोत्सवांतर्गत चोरीतील जप्त मुद्देमालाचे मूळ मालकांना वाटप

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0033.jpg

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे अमृत महोत्सवांतर्गत चोरीतील जप्त मुद्देमालाचे मूळ मालकांना वाटप                                                 रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत चोरीतील जप्त मुद्देमालाचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३६५ / २०१९ भा.दं.वि.सं.क. ३७९ मधील फिर्यादी सौ. पल्लवी विजय ओरपे (रा. करबुडे, ता. रत्नागिरी ) यांचा १,७१,२२०/- रु. किंमतीचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने त्यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच या उपक्रमाअंतर्गत सायबर पोलीस ठाण्याकडुन हस्तगत केलेले एकुण ४० मोबाईल हँडसेट मुळ मालकांना परत देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी मुद्देमाल परत मिळालेल्या लोकांनी आपले मनोगत व्यक्त करून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले. तसेच पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मुद्देमाल परत मिळविण्यासाठी जे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मेहनत घेतली अशा सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा ही दिल्या.

यावेळी कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी विभाग सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक तथा पोलीस उपअधीक्षक (गृह) मारुती जगताप, पोलीस निरीक्षक स्थागुशा हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक श्री. शिरीष सासणे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पुरळकर आदी उपस्थित होते.

Previous articleसरकारवरचा माझा विश्वासच उडाला ! सामूहीक बलात्कार प्रकरणी बिल्कीस बानोनं मौन सोडलं…
Next articleअभिजित हेगशेटये यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here