आशाताई बच्छाव
प्रत्येक तरूण आत्मनिर्भर झाला तर भारत आत्मनिर्भर होईल- कौस्तुभ फाटक
रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कौस्तुभ फाटक यांचे ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू कर्तव्यमाथा या विषयावर प्रवचन झाले.
कौस्तुभ फाटक यांनी आपल्या प्रवचनातून आजच्या तरूण पिढीला स्वातंत्र्य मिळवायचे नाहीये तर ते टिकवायचे आहे, प्रत्येक तरूण आत्मनिर्भर झाला तर भारत आत्मनिर्भर होईल तसेच विविध क्रांतिकारकांचे देशकार्य उलगडून सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाची आठवण ठेवली पाहिजे.असेही कौस्तुभ फाटक यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकारणी सदस्य विनायक हातखंबकर, प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव,मराठी विभागप्रमुख सौ.अनन्या धुंदूर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.






