Home विदर्भ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मातृशक्तिने अंगिकरण्याची आवश्यकता आमदार डॉक्टर देवरावजी होळी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मातृशक्तिने अंगिकरण्याची आवश्यकता आमदार डॉक्टर देवरावजी होळी

90
0

राजेंद्र पाटील राऊत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मातृशक्तिने अंगिकरण्याची आवश्यकता

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

तळोधी मोकासा येथे सावित्रीच्या लेकींचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते सत्कार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                            तळोधी (मो) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव साजरा

दिनांक ७ जानेवारी २०२२ गडचिरोली

स्त्री शिक्षणाचा वसा राबविणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार ही काळाची गरज असून ते विचार आजच्या मातृशक्तीने अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी तळोधी मोकासा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव कार्यक्रमात केले
यावेळी आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या हस्ते सावित्रीच्या लेकिंचा सत्कारही करण्यात आला

सावित्रीबाई फुले या थोर भारतीय समाजसुधारक ,शिक्षणतज्ञ, भारतातील पहिल्या महिला शिक्षीका म्हणून ओळखल्या जातात. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी भारतातील महिलांच्या शिक्षणाला सुरुवात करून मातृशक्तीला मजबूत व सक्षम करण्याचे कार्य सुरू केले. सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आजच्या स्त्री शक्तीला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या मातृशक्तीने अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गडचिरोलीचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

Previous articleसोहम मंञे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यातून चौथा तर नांदेड जिल्ह्यातून दुसरा.
Next articleबच्चुभाऊ कडू यांच्या प्रहारने एका विधवा भगिनीला घर बांधून दिला आधार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here