Home नांदेड सोहम मंञे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यातून चौथा तर नांदेड जिल्ह्यातून...

सोहम मंञे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यातून चौथा तर नांदेड जिल्ह्यातून दुसरा.

173
0

राजेंद्र पाटील राऊत

सोहम मंञे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यातून चौथा तर नांदेड जिल्ह्यातून दुसरा.

मुखेड / संग्राम पाटील तांदळीकर युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु) येथील सोहम गंगाधर मंञे हा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यातून चौथा व नांदेड जिल्ह्यातून दुसरा येण्याचा बहुमान मिळवले

दि.१२ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीेने इयत्ता पाचवी सी.बी.एस.ई पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा घेण्यात आली होती.या परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये सोहम मंत्रे यांनी ३०० पैकी २७२ गुण घेऊन राज्यातून चौथा तर नांदेड जिल्ह्यातून दुसरा येण्याचा बहुमान मिळवले.

सोहम हा ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल,नांदेड येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. महादेववाडी जि.प.शाळेचे शिक्षक गंगाधर मंञे व डेरला जि.प.शाळेच्या शिक्षीका सौ.अंजली भंडे / मंञे यांचा मुलगा आहे.त्याला प्रा.अनुराधा मिस , कृष्णा बिरादार ,वळगे यांच्यासह आई – वडिलांचे मार्गदर्शन लाभले त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here