Home मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..! फडणवीसांनी दिला सगळ्यांना सुखद धक्का..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..! फडणवीसांनी दिला सगळ्यांना सुखद धक्का..!

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0047.jpg

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..! फडणवीसांनी दिला सगळ्यांना सुखद धक्का..!

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

शिवसेना नेते श्री. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांनाही आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी राजभवन सभागृहाच्या मंचावर आले तेव्हा शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केला.
भापजा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याच्या नवे मुख्यमंत्री असतील, भाजपा पक्षाचा या सरकारला पाठिंबा असेल, अशी घोषणा घोषणा केली होती. तसेच ही घोषणा करताना मी या सरकारचा भाग नसेन, मात्र या सरकारची माझ्यावर जबाबदारी असेन, असेही फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर भाजपच्या दिल्लीमधील शीर्ष नेतृत्वाने वेगळी भूमिका मांडली आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनंतीवरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन केलं. तसेच महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रती त्यांची खरी निष्ठा आणि सेवाभाव दाखवतो. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”
“भाजपाने असा निर्णय घेतला आहे की, एकनाथ शिंदे गटाला आम्ही समर्थन देणार असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील,” अशी घोषणा दुपारी राजभवनामधील पत्रकार परिषदेत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर पुढे बोलताना आपण या मंत्रीमंडळामध्ये सहभागी होणार नसून बाहेरुन सरकारचं काम सुनियोजित पद्धतीने होत आहे की नाही याकडे लक्ष ठेवणार असून काम सुरळीत चालेल अशी काळजी घेऊ, असंही फडणवीस म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये, “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजपा आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला एक मोठा गट आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल,” असं सांगितलं होतं.
स्वत:च्या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस यांनी, “मी सरकारच्या बाहेर राहून काम करणार आहे. हे सरकार नीट काम करेल याची जबाबदारी माझीही असेल,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. “या सरकारला यशस्वी करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करु. पंतप्रधान मोदींनी जे विकासपर्व सुरु केलं आहे ते आम्ही राबवू. मागील अडीच वर्षांपासून जो महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागला होता. तो निघेल आणि पुन्हा विकासाची एक्सप्रेस धावू लागेल,” असं फडणवीस म्हणाले. मात्र दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेनंतर अचानक दिल्लीवरुन सूत्र हलली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here