Home मुंबई पंतप्रधान मोदींचा एक फोन, नाराज फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली..?

पंतप्रधान मोदींचा एक फोन, नाराज फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली..?

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0046.jpg

पंतप्रधान मोदींचा एक फोन, नाराज फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली..?

मुंबई (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल. “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे. भाजपा शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील,” अशी माहिती फडणवीस यांनी याआधी दिली.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याआधी आज फक्त एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं सांगण्यात आलं होतं. तसेच मी या सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसेन, असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र भाजपाचे केंद्रीय नेते अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होऊन राज्यात सहभागी व्हावे अशी विनंती केली. या विनंतीनंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासा होकार दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबतच फडणवीस यांचादेखील शपथविधी होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हा आश्चर्याचा धक्का असल्याचं म्हटलंय. “भाजपात दिल्ली किंवा नागपूरचा आदेश आला की तडजोड नसते. त्यामुळे फडणवीसांना त्या आदेशाचं पालन करावं लागलं आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी गेली,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
शरद पवार म्हणाले, “राज्याचे ३८-३९ आमदार आसाममध्ये गेले होते. तेव्हा त्यांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिक असेल असं वाटत नाही. मात्र, भाजपात दिल्लीचा आदेश असो, की नागपूरचा आदेश असो, तो आदेश आला की त्यात तडजोड नसते. हा आदेश आला आणि त्याचा परिणाम राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. त्याची कल्पना कुणालाही नव्हती. कदाचित एकनाथ शिंदे यांनाही नसावी.”
“हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा आदेश झाला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली की ती स्विकारायची असते. याचं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलं आहे,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं

Previous articleराजकीय पटलावर ताजी ब्रेकींग न्युज
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..! फडणवीसांनी दिला सगळ्यांना सुखद धक्का..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here