Home परभणी जिंतूर तालुक्यात ग्रामीण भागात आवास योजनेत धनदांडग्याचे नावे….! गरिबांना हक्काचे घर मिळत...

जिंतूर तालुक्यात ग्रामीण भागात आवास योजनेत धनदांडग्याचे नावे….! गरिबांना हक्काचे घर मिळत नसल्याच्या तक्रारी

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20220628-WA0008.jpg

जिंतूर तालुक्यात ग्रामीण भागात आवास योजनेत धनदांडग्याचे नावे….!
गरिबांना हक्काचे घर मिळत नसल्याच्या तक्रारी

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी) जिंतूर:- तालुक्यातील ग्रामीण भागात गोरगरिबांच्या पक्क्या घरांचे स्वप्न प्रत्येक्षात आणण्याकरिता शासनाच्या वतीने रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना तसेच पारधी आवास योजनेअंतर्गत तब्बल 3 हजार 311 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 494 घरकुलांचे उद्दिष्टे पूर्ण झाले आहे. मात्र पंतप्रधान आवास योजनेत गरजू लाभार्थ्यांपेक्षा धनदांडग्याची नावे अधिक दिसून येत असल्याने योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात सन 2019-20 साली रमाई आवास योजने अंतर्गत 439 घरकुलांचे उद्दिष्ट होते त्यापैकी 257 घरकुल पूर्ण झाले आहे तर 232 अपूर्ण आहेत, शबरी आवास योजनेत 449 उद्दिष्टांपैकी 296 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहेत, पारधी आवास योजनेअंतर्गत 11 पैकी 9 घरकुल पूर्णत्वास आले आहे आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 हजार 412 पैकी 982 घरकुलांचे बांधकाम मार्गी लागले आहे. परंतु तालुक्यातील ग्रामीण भागातील नव्यानेच प्रकाशीत झालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील यादीत जमीनदार अगोदरच ज्यांनी एक दोन मजली पक्के घर बांधले आहेत अशाचे नाव आहेत ज्यांनी मुळगाव सोडले आता ते दुसरीकडे वास्तव्यास आहेत अशाचे नावे आहेत ज्यांना घराची गरज नाही अशाचे नाव असल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे तालुक्यात ग्रामीण भागात अनेक गरजू लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत काही गरजू गरीब लोकांनी तर वृद्ध होऊन आपले प्राण सोडले आहेत तरीपण त्यांचे पक्क्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाहीत अगोदर गावातील सरपंच ग्रामसेवक यांच्या अंतिम यादी नुसार घरकुलाची यादी प्रकाशित होत गेली परंतु त्यांनी ही आपल्या मर्जीतल्या व जवळच्या माणसाला घरे दिली त्यामुळे खऱ्या लाभार्थीना वर्षोनुवर्षे वाट पाहावी लागत असून अद्याप त्यांचे नाव प्रतीक्षा यादीत आले नाही मात्र चुकीची केंद्राकडे ऑनलाईन यादी गेल्यामुळे त्यांचे नाव त्या यादी मध्ये येणे अशक्य झाले आहे तरी गरीब ग्रामस्थांना या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही त्यामुळे गरीब वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत गरीब राहत आहेत आणि श्रीमंत श्रीमंत होत आहेत म्हणून गावातील सरपंच ग्रामसेवक गटविकास अधिकारी व संबंधित पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे अधिकारी यांनी यादी तयार करून ज्या लाभार्थ्यांना यापूर्वी लाभ मिळालेला आहे त्यांचे नाव पण या यादीत आले आहेत ज्यांची पक्के घरे आहेत त्यांचे पण घरे रद्द करावे जे गावात अनेक वर्षांपासून राहत नाहीत व बाहेर गावी त्यांनी घरकुलाचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व बोगस लाभार्थ्यांची नावे रद्द करून त्या जागी ज्यांना अत्यावश्यक आहे अशा गरीब लाभार्थी कुटुंबाला वाटप करण्यात यावे अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here