Home मुंबई दिवाळीनंतर कोणाचे दिवाळे कोणाची दिवाळी….? निवडणुका दिवाळीनंतर होणार राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे..!

दिवाळीनंतर कोणाचे दिवाळे कोणाची दिवाळी….? निवडणुका दिवाळीनंतर होणार राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे..!

87
0

राजेंद्र पाटील राऊत

दिवाळीनंतर कोणाचे दिवाळे कोणाची दिवाळी….? निवडणुका दिवाळीनंतर होणार राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे..!

मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

महाराष्ट्र मध्ये 22 महानगरपालिका सहा जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. निवडणुका जून-जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार असल्याचे वृत्त चुकीचा असून असे कोणतेही प्रतिज्ञापत्र दिले नाही.
जून-जुलैमध्ये निवडणुका होणार याबाबतचे वृत्त मध्ये अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते परंतु या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणतेही प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने दाखल केले नाही अशी माहिती माहिती आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.
एकूण बावीस महानगरपालिका 25 जिल्हा परिषद 275 पंचायत समिती 210 नगरपालिका एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका एकाच रक्त घेणे शक्य नाही त्या दोन तीन टक्के घ्यावे लागतील असेही म्हणजे आयोगाचे आहे त्यामुळे 4 मे रोजी जरी सुनावणी झाली नाही तरी जून-जुलैमध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी या निवडणुका होण्याची शक्यता नाही दिवाळीनंतर या निवडणुकांचा बार उडणार हे तर आता निश्चित होत आहे तसेच ही प्रक्रिया सुरू झाली तरी किमान 35 दिवसांच्या निवडणूक कार्यक्रम असतो त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपची राजकीय खेळी किंवा राजकीय दिवाळी चे लाडू होणार एवढे मात्र नक्की झाले आहे त्यामुळे आता मुदत संपलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळीनंतरच होती हे आता निश्चित होऊ लागले आहे त्यामुळे अजून काही महिने निवडणुकांसाठी वाट पाहण्याची वेळ ही राजकीयदृष्ट्या सर्व उमेदवारांवर आलेली आहे.
मुदत संपलेल्या अजून पर्यंत संपणाऱ्या महानगरपालिका पुढील प्रमाणे आहेत कोल्हापूर पुणे पिंपरी-चिंचवड ठाणे भिवंडी निजामपूर मुंबई नवी मुंबई कल्याण-डोंबिवली उल्हासनगर वसई-विरार पनवेल मालेगाव नागपूर सोलापूर अकोला परभणी लातूर अमरावती चंद्रपूर नांदेड आणि औरंगाबाद अशा या 22 महानगरपालिका आहेत त्यांची मुदत जूनमध्ये संपला आहे आणि याच्या निवडणुका आता दिवाळी पर्यंत होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा एकदा 2019 लोकसभेचे प्रमाणेच दिवाळीमध्ये की निवडणुका होऊन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागलेले आहेत.

Previous articleकोळकेवाडीत कालव्यात चौघे बुडाले ; दोघांना वाचिवण्यात यश, दोघे बेपत्ता
Next articleसरकारी नोकरीचे स्वप्न अपुरे राहणार..? राज्याच्या तिजोरीवर भार, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here