Home मुंबई सरकारी नोकरीचे स्वप्न अपुरे राहणार..? राज्याच्या तिजोरीवर भार, महाविकास आघाडी सरकारचा मोठा...

सरकारी नोकरीचे स्वप्न अपुरे राहणार..? राज्याच्या तिजोरीवर भार, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

25
0

राजेंद्र पाटील राऊत

सरकारी नोकरीचे स्वप्न अपुरे राहणार..? राज्याच्या तिजोरीवर भार, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

राज्यातील तिजोरीत खडखडाट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील भार करण्यासाठासाठी महाविकास आघाडी सरकाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील तिजोरीत खडखडाट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील भार करण्यासाठासाठी महाविकास आघाडी सरकाने मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयात आता कर्मचाऱ्यांचं आऊटसोर्सिंग होणार आहे. तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबत शासननिर्णय जाहीर करण्यात आला.
20 ते 30 टक्के खर्चकपातीचे उद्दीष्ट आऊटसोर्सिंगमधून साधले जाईल. मात्र यासाठी कोणतीही वेगळी पदनिर्मिती होणार नाही. कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांचं आऊटसोर्सिंग होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे ही कंत्राटीपद्धत असणार आहे. या सरकारच्या निर्णयामुळे आता खासगी करणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
संगणक अभियंता, डेटा एन्ट्री ऑपरेटर, टेलिफोन ऑपरेटर, वाहनचालक, गार्डनर, इतर अर्धकुशल कामगार, लिफ्ट ऑपरेटर, केअरटेकर, शिपाई, चपराशी, चौकीदार, सफाई कर्मचारी, मदतनीस, हमाल ही पदं आता आऊटसोर्स होणार आहेत.
संगणक परिचालक, लिपिक, सफाई कामगार आणि शिपाई यांची भरती आता बाहेरुन करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचा आस्थापना खर्च कमी होऊन विकासकामांसाठी पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भरती केली की सरकारची जबाबदारी राहते. कारण पगार आणि निवृत्तीवेतन द्यावे लागते. सरकारचा आता आऊटसोर्सिंगमुळे हा खर्च वाचणार आहे.

Previous articleदिवाळीनंतर कोणाचे दिवाळे कोणाची दिवाळी….? निवडणुका दिवाळीनंतर होणार राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे..!
Next articleलेंडी धरणातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लाउ – डॉ.विपीन इटनकर..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here