Home कोकण कोळकेवाडीत कालव्यात चौघे बुडाले ; दोघांना वाचिवण्यात यश, दोघे बेपत्ता

कोळकेवाडीत कालव्यात चौघे बुडाले ; दोघांना वाचिवण्यात यश, दोघे बेपत्ता

42
0

राजेंद्र पाटील राऊत

कोळकेवाडीत कालव्यात चौघे बुडाले ; दोघांना वाचिवण्यात यश, दोघे बेपत्ता
✍️ चिपळूण: विजय पवार कार्यकारी संपादक मुंबई.युवा मराठा न्यूज

चिपळूण /अलोरे -: येथील चार युवक कोळकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले असता कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडत होते. त्यातील दोघांना तेथील धनगर बांधवांनी वाचवले. मात्र दोघे अद्याप बेपत्ता आहेत. त्यात अलोरे सोमेश्वर मंदिर नजीक राहणारा सुजय संजय गावठे व त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर यांचा समावेश आहे.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार बुधवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान दरम्यान सुजय गावठे, ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर सोबत शाहीन कुट्टीनो , रुद्र जंगम आणि कुत्रा कोळकेवाडी टप्पा चारनजीक कालव्यात पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते अडकले. पाण्यात अडकल्यावर चौघांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथेच काम करणाऱ्या धनगर बांधवानी धाव घेतली आणि आपल्या जीवाची पर्वा न करता रुद्र आणि शाहीन याना बाहेर काढले.

या वेळी सुजय सुद्धा बाहेर येत होता. मात्र ऐश्वर्या बुडत असल्याचे बघून तो पाण्यात परत गेला. त्यानंतर दोघे बेपत्ता झाले.
अलोरे पंचक्रोशीतील सरपंच कोळकेवाडी श्री. निलेश कदम,प्रदीप सकपाळ , श्री. बाबा वरक, महेश शिंदे, ओमकार शिंदे, विशाल शिंदे , मंदार कदम चेतन शिंदे, प्रतीक पालकर, किशोर कदम, ईश्वर देवरुखकर, राकेश देवरुखकर युवा कार्यकर्त्यांनी तसेच सर्व कोळकेवाडी तांबडवाडी ग्रामस्थांनी कोळकेवाडी धरण परिसराकडे धाव घेतली. बचावकार्य सुरुवात झाली. अलोरे शिरगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना या दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पाहणी केली बेपत्ता असलेल्या दोघांना वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र रात्र वाढू लागल्याने बचावकार्य साडेसातनंतर थांबवण्यात आले.

Previous articleसामाजिक कार्यकर्ते गजानन पवार पाटील यांच्या प्रयत्नाला यश
Next articleदिवाळीनंतर कोणाचे दिवाळे कोणाची दिवाळी….? निवडणुका दिवाळीनंतर होणार राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here