Home मराठवाडा पाणी टंचाईच्या झळा; पाण्यासाठी दाहिदिशा!

पाणी टंचाईच्या झळा; पाण्यासाठी दाहिदिशा!

56
0

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे                              गेल्या आठ दिवसापासून उन्हाची तीव्रता खूप प्रकर्षाने जाणवत चालले आहे आपले तापमान हे 42 ते 45 डिग्रीपर्यंतत पोहोचत आहे उन्हाचे सटके खाताना पाण्याची किंमत जाणवत आहे आपल्याच महाराष्ट्रामध्ये अशी काही गावे आहेत या गावांमधील महिलांना पाणी आणण्यासाठी चार ते 5 किलोमीटर पर्यंत जाऊन पाणी आणावे लागत आहे हे मी माझ्या डोळ्याने मराठवाडा भागामध्ये गेले असताना दौरे चालू असताना मला पहावयास मिळाले आणि अस फिलींग मनामध्ये आले की विनाकारण अनेक मार्गाने पाण्याचा गैरवापर करणारे लोकही या महाराष्ट्रात जीवन जगत आहेत म्हणून पाणी वाचवण्या बाबत काही लिहावयाचे वाटले म्हणून हा लेख लिहित आहे माझ्या कामानिमित्त मला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी प्रखरतेने एक गोष्ट मला पहावयास मिळाली ती म्हणजे पाण्याचा अपव्यय वर्षा हजारो लिटर पाणी हे रोज वाया जाते पाण्या अभावी पीक करपल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या की अंगावर काटा येतो अशावेळी शहरी भागात सुसंस्कृत वस्त्यांमध्ये ही अशा प्रकारचा पाण्याचा अपव्यय होताना बघितले की संताप येतो, आणि वाटते की पाणी जपूनच वापरले पाहिजे पर्जन्य जल संचय पाण्याचा पुनर्वापर आणि पाण्याचे नियोजन व गरजेनुसार वाटप करणे काळाची गरज आहे.बर्‍याच जणांना हे माहीतच नसते की आपण रोजच्या दैनंदिन जीवनात किती पाणी फुकट घालवतो किंवा माहित असूनही दुर्लक्ष करतो या मानसिकतेतया मानसिकतेत सुधा झाला तरच काही उपाययोजना करणं शक्य आहे.आत्ता आपण पाणी कोण कोणत्या मार्गाने फुकट वाया घालवतो ते पाहू.वॉशर खराब झाल्याने बऱ्याच घरात थेंब-थेंब पाणी सांडत असते आशा नळांची त्वरित दुरुस्ती करा कारण या शुल्लक वाटणार्‍या गळतीतून संपूर्ण दिवसभरात कितीतरी लिटर्स पाणी वाया जात असते आंघोळीसाठी शॉवर आणि बात टबचा वापर टाळा कारण त्यात खूप पाणी अनावश्यक वाया जाते. दाढी करताना आणि दात घासताना नळ चालू ठेवणे टाळा. धोनी भांडी करणाऱ्यांना नळ चालू ठेवून काम करण्याची मनाई करा ग्रहण काळातले पाणी वापरू नये या अंधश्रद्धेला बळी न पडता साठवलेले पाणी टाकून देऊ नकापाण्याची टंचाई नसेल तर वाजवीपेक्षा जास्त पाणी साठवून ठेवू नका कारण बरेच जण कालचं पाणी शीळ म्हणून टाकून देतात आणि रोज ताज पाणी भरतात.या आणि अशा अनेक प्रकारे पाणी घराघरात फुकट जात असते आता आपण सोसायट्यांमध्ये पाणी फुकट कसे जाते ते पाहू सोसायटीत यातल्या झाडांना पाणी देताना हजारो लिटर पाणी वाया जातेत्यामुळे तज्ञांचा सल्ला घेऊन ठिबक सिंचन किंवा पाणी कमी वापरणारे यंत्रसामुग्री बसवावे बेकायदा नळजोडणीबेकायदा नळजोडणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा घराघरातून किचन बाथरूम आणि वास बेसिन मधून वाया जाणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा बसवून घ्या गाड्या धुण्यासाठी पाण्याचा प्रचंड उपसा होतो त्यामुळे गाड्या आठवड्यातून एकदाच धुवा पाण्याचे टाके भरूनही पंप चालू राहिल्याने जे पाणी फुकट वाया जातं ,त्याला आळा घालण्यासाठी सेंसर असणारे पंप वापरा त्यामुळे ते पंप टाकी भरल्यावर आपोआप बंद होतील आणि पाण्याचा व विजेचा अपव्यय टाळेल बोरवेल चा वापर मर्यादित करा जमिनीत पाणी मुरले तर बोरवेलची क्षमता वाढेल त्यासाठी जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरू वा.वर्षातून दोनदा तज्ञांकडून सोसायटीचं वॉटर ऑडिट करात्यामुळे पाण्याचा गैरवापर आणि अपव्यय टाळता येईल.दहीहंडी होळी धुळवड यांसारख्या सणांना पाण्याचा वापर टाळाया अशा बऱ्याच प्रकारे पाणी आपले फुकट वाया जातेपण ते जाऊ नये यासाठी अनेक उपाय योजना आहेत या उपाययोजना अमलात आणण्यासाठी आपल्या दैनिक आयुष्यात विशेष बदल करण्याची गरज नाहीगरज आहे ती केवळ मानसिकतेत बदल करण्याची निसर्गाने मुबलक प्रमाणात दिलेल्या या संपत्तीचा जर आपण आदर केला नाही तर काय दुष्परिणाम होऊ शकतात हे सर्व आपण सगळेच जाणतोच आहे.आपण वापरत असलेल्या पाण्यासाठी अल्प मोबदला देतो त्यामुळे पाण्याची आपल्याला किंमत नाही पाणी जे सरकार मार्फत पुरवले जाते त्यासाठी तर पैसे आकारले जातातच.पण जे पाणी नागरिकांकडून वापरल्यानंतर नाल्यांमध्ये कॅनॉल मध्ये सोडले जाते,त्यासाठी ही पैसा आकारला गेला तर फुकट जाणाऱ्या पाण्याची किंमत कळू शकेल.पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे म्हणूनच पाणी फुकट घालवणे हा गुन्हा तर आहेच पण निसर्गाच्या दृष्टीने पापही आहे.(प्रो प्रा प्रशांत सुरेश नागणे)

Previous articleदौंड तालुक्यातील शेतकऱ्याने केला 55 टन वाहतुकीचा नवा विक्रम,
Next articleऐन उन्हाळ्यात परभणीच्या कावी गावात देशी दारुचा महापूर पोलिसांचे दुर्लक्ष!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here