Home परभणी ऐन उन्हाळ्यात परभणीच्या कावी गावात देशी दारुचा महापूर पोलिसांचे दुर्लक्ष!

ऐन उन्हाळ्यात परभणीच्या कावी गावात देशी दारुचा महापूर पोलिसांचे दुर्लक्ष!

340

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठा न्युज ‌‌:-शत्रुघ्न काकडे
जिंतूर (परभणी) तालुक्यातील बामणी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या कावी या गावात अवैध देशी दारू ची विविध आठ ठिकाणी देशी दारू ची बिनधास्तपणे विक्री होत आहे.
बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत कावी हे गाव 11 किमी आहे.या गावात जणू काय देशी दारू विकण्याची स्पर्धा च आहे.असे सध्या दृष्य कावी गावांत पहावयास मिळत आहे. वार्ड नंबर 1 मध्ये एक ठिकाणी आणि वार्ड नंबर 2 मध्ये एक दुकान आणि वार्ड नंबर 3 मध्ये 6 ठिकाणी अवैध देशी दारू ची विक्री बिनधास्तपणे होत असल्याचे पहावयास मिळते आहे.विशेष म्हणजे या गावाची लोकसंख्या दोन हजार असून या छोट्या गावात अवैध देशी दारूची 8 दुकाने झाली आहेत.कमी मेहनती मध्ये जास्त पैसे कमावण्याच्या मोहात हे दारू दुकाने वाढली आहे. पोलिसांनी येथे एकही दुकानावर कार्यवाही केल्याचे आढळून आले नाही.जर कोणी या अवैध दुकानाची तक्रार करण्याचा प्रयत्न केला ते त्याला शिवीगाळ होत असल्याची माहिती मिळत आहे. आणि पोलीस मात्र या विषयांवर मूग गिळून गप्प बसत आहेत.यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. तळीरामांची संख्या या गावात जास्त प्रमाणात पहावयास मिळत आहे. याचा विपरीत परिणाम सर्वसाधारण महिलांच्या संसरावर होत आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाल्याचे उदाहरण या गावात पहावयास मिळते आहे. या बाबींची दखल पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांतुन होत आहे.प्रतिक्रिया..

कावी गावातील अनेक संसार या दारू पायी उद्धवस्त होत आहेत.गावात दारू बाबतीत त्रास आहे.पिणारांपासून सर्व सामान्य लोकांना त्रास होत आहे.पोलिसांनी या दुकानांवर ऍक्शन घेऊन दुकाने बंद करायला पाहिजे.आमचे गावं दारूमुक्त होणे गरजेचे आहे.पोलिसांकडून हप्तेखोरी होत आहे.
राम काठमोरे कावी, सरपंच

Previous articleपाणी टंचाईच्या झळा; पाण्यासाठी दाहिदिशा!
Next articleजगायचं कुणासाठी…? (अंतर्मुख करणारा लेख, वाचाच)  राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.