Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणे ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ शासकीय योजनेचे तीन तेरा नऊ बारा !

व-हाणे ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ शासकीय योजनेचे तीन तेरा नऊ बारा !

237

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणे ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ शासकीय योजनेचे तीन तेरा नऊ बारा !
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव- मालेगाव तालुक्याच्या राजकारणात अग्रेसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व-हाणे ग्रामपंचायतीचा अजब गजब कारभार चव्हाट्यावर आला असून शासकीय योजनेचे तीन तेरा नऊ बारा वाजविल्याचा प्रकार येथे उघड झाला आहे.
मालेगांव मनमाड रोडवर असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीने शासकीय योजनेतून खरेदी केलेल्या सायकली गेल्या काही वर्षापासून धुळ खात पडलेल्या असून त्या सायकली अद्यापही गरजू लोकांपर्यत पोहचल्याच नाहीत.म्हणजे “आंधळ दळतंय अन कुत्र पीठ खातंय”अशी येथील ग्रामपंचातीची अवस्था झालेली आहे.
ग्रामपंचायतच्या जबाबदार ग्रामसेवकाचा नाकर्तपणा व गावकीच्या राजकारणात या सायकली पुर्णत मोडकळीस आल्या असून शासनाने खर्च केलेला हा पैसा पाण्यात गेल्याचाच हा परिणाम आहे.मात्र पंचायत समितीच्या कुठल्याही सक्षम अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची अद्याप पर्यत दखल घेऊ नये म्हणजे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Previous articleयुवा मराठा न्युजच्या मुंबई कार्यालयाचे आज उदघाटन
Next articleयुवा मराठा न्युज चँनल महाराष्ट्र कार्यालयाचे मुंबईत उदघाटन संपन्न!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.