Home Breaking News यापुढे होणा-या जिल्हा वार्षिक योजनांच्या बैठकांवर आमदार खासदारांचा बहिष्कार भाजपा आमदार-खासदारांचा पत्रकार...

यापुढे होणा-या जिल्हा वार्षिक योजनांच्या बैठकांवर आमदार खासदारांचा बहिष्कार भाजपा आमदार-खासदारांचा पत्रकार परिषदेतून पालकमंत्र्यांना ईशारा.

42
0

यापुढे होणा-या जिल्हा वार्षिक योजनांच्या बैठकांवर आमदार खासदारांचा बहिष्कार भाजपा आमदार-खासदारांचा पत्रकार परिषदेतून पालकमंत्र्यांना ईशारा.

जिल्हा विकासाच्या मागणीवरील निधी उपलब्ध करून देत नसल्याचा भाजपा आमदार-खासदारांचा गंभीर आरोप

दिनांक : २८/०४/२०२२

जिल्हयातील स्थानिक आमदार-खासदारांना जिल्हयातील आवश्यक असणा-या विकास कामांची जाणीव आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतुन विकास कामांची आवश्यकता लक्षात घेवून विकास कामांची नावे व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा असे पत्र पालकमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना अनेकदा स्मरणपत्रासह दिले. परंतू जिल्हयातील स्थानिक आमदार-खासदारांच्या पत्रांच्या मागणीची कुठेही दखल घेतली जात नाही. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणा-या विकासासाठी दिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखवून आमदार-खासदारांचा अपमान करित असल्याने गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या निषेधार्थ यापुढे होणाऱ्या जिल्हा वार्षिक नियोजनाच्या बैठकांवर बहिष्कार करण्याच्या निर्णय भाजपाचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी घेतला. असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली

या पत्रकार परिषदेला आमदार डॉक्टर देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, यांचेसह जिल्हा महामंत्री प्रमोद जी पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे ,नगर परिषद माजी अध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, उपाध्यक्ष श्री अनिल कूनघाडकर, पंचायत समितीचे माजी सभापती विलासजी दशमुखे, जिल्ह्याचे नेते अनिल भाऊ पोहनकर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, महिला आघाडीच्या नेत्या वर्षाताई शेडमाके, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे,यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
मागील सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये सर्वसाधारण आदिवासी उपाययोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना, अनुसुचित जाती उपयोजना, जिल्हा खनीज निधी, ग्रामपंचायत जनसुविधेसाठी विशेष अनुदान ई. अंतर्गत आमदार-खासदारांनी निधीची मागणी केलेल्या पत्रांना पालकमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी केराची टोपली दाखविलेली आहे. केवळ पत्राद्वावारे मागणी करा निधी उपलब्ध करून दिला जाईल, जिल्हयाच्या विकासाठी लागणारा निधी आपण कमी पडू देणार नाही असे केवळ पोकळ आश्वासन दिले. मात्र उपलब्ध करून दिला नाही. मागील ३ वर्षापासूनचा खालील निधीवाटपाचा तत्का पाहिल्यास जिल्हयातील नागरिकांच्या लक्षात येईल की, केवळ कागदांवर निधी वाटप करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे विकासात्मक कामे झालेली नाहीत. मागासलेला जिल्हा म्हणून जिल्हयाच्या विकासासाठी मिळणारा कोटयावधींचा निधी अखेर कोठे गेला असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आमदार-खासदरांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून विकास कामांसाठी मागणी करूनही मागील ३ वर्षापासून कोणत्याही कामांसाठी निधी उपलब्ध करून देत नसल्याने पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ यापुढे होणा-या जिल्हा वार्षिक नियोजनाच्या बैठकांवर बहिष्कार करण्याचा निर्णय भाजपाचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवरावजी होळी व आरमोरीचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी घेतलेला आहे

मागील ३ वर्षाचा कागदोपत्री निधी वितरणाचा तक्ता.

अ.क्र.
क्षेत्र
सन 2019-20
सन 2020-21
सन 2021-22

1.
सर्वसाधारण
28500.00
25640.00
27500.05

2.
आदिवासी उपयोजना
16312.75
14717.98
14312.98

3.
आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना
250.06
204.15
14312.98

4.
अनु.जाती उपयोजना
3319.00
3411.19
3400.00

5.
ग्रामपंचायत जनसुविधा विशेष अनुदान
———
774.00
1400.00

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here