Home कोकण रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे खास दिवाळी प्रदर्शनाचे उदघाटन

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे खास दिवाळी प्रदर्शनाचे उदघाटन

293
0

राजेंद्र पाटील राऊत

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे खास दिवाळी प्रदर्शनाचे उदघाटन
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I २८ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

रत्नागिरी -कोरोना आणि समाजात आलेली मरगळ दूर झटकत आता रत्नागिरी पूर्वपदावर येत आहे. दिवाळीचे निमित्त साधून रत्नागिरी ग्राहक पेठेने आयोजित केलेल्या महिला बचत गट, उद्योगिनींनी साकारलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा महिला पतपेढीच्या अध्यक्षा सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून केले.

शहराजवळील जे. के. फाइल्स स्टॉप येथील साई मंगल कार्यालयात हे प्रदर्शन सुरू झाले असून ते पाच दिवस चालणार आहे. याप्रसंगी सौ. युगंधरा राजेशिर्के म्हणाल्या की, रत्नागिरी ग्राहक पेठेचे प्रदर्शन म्हणजे महिलांना माहेरचा आंनद देणारेच असते. हे कुटुंब चांगल्या प्रकारे चालले पाहिजे याकरिता प्राची शिंदे भूमिका बजावत आहेत. कोरोनावर मत करून तुम्ही उभ्या राहिल्यात हा विश्वास त्यांनी दाखवून दिला. लोकांनी मरगळ झटकली आहे, त्यामुळे दिवाळी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळेल.

या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष स्वरूपा साळवी, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, नगरसेविका शिल्पा सुर्वे, नर्सरी उद्योजिका कोमल तावडे, रत्नागिरी ग्राहक पेठेच्या संस्थापक अध्यक्ष प्राची शिंदे उपस्थित होत्या.

या वेळी प्राची शिंदे म्हणाल्या की, आतापर्यंत या प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला यशस्वी झाल्या आहेत. गेली १५ वर्षे हे प्रदर्शन सुरू आहे. कोरोना काळातही नियम पाळून प्रदर्शन घेतले. कोरोना काळात महिलांना त्रास सहन करावा लागला. परंतु गेल्या वर्षी प्रदर्शनात सहभाग घेतल्यावर त्यांना समाधान मिळाले. त्यामुळे यंदासुद्धा दिवाळीनिमित्त प्रदर्शन भरवले आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी मदत दिली आहे. त्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी होते.

या वेळी कोमल तावडे, शिल्पा सुर्वे आणि ऐश्वर्या जठार, स्वरूपा साळवी यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांना प्रोत्साहन दिले. महिला बचत गटासाठी योगदान देणाऱ्या शकुंतला झोरे यांच्यासह सर्व मान्यवरांचा पुष्परोपटे देऊन सन्मान करण्यात आला. अनघा निकम यांनी सूत्रसंचालन केले.

Previous articleप्रदूषणमुक्त दिपावली संकल्प अभियान २०२२ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठीची शपथ फाटक हास्कूलमध्ये संपन्न
Next articleखोंटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकर्याची दिवाळी काळी: खासदार अशोक नेते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here