Home कोकण प्रदूषणमुक्त दिपावली संकल्प अभियान २०२२ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठीची शपथ फाटक हास्कूलमध्ये संपन्न

प्रदूषणमुक्त दिपावली संकल्प अभियान २०२२ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठीची शपथ फाटक हास्कूलमध्ये संपन्न

143
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रदूषणमुक्त दिपावली संकल्प अभियान २०२२ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठीची शपथ फाटक हास्कूलमध्ये संपन्न
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I २८ ऑक्टोबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

रत्नागिरी : बुधवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी रत्नागिरी नगर परिषद व दिव्य स्वप्न फाउंडेशन आणि फाटक हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने फाटक हायस्कूल मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणमुक्त दिपावली संकल्प अभियान २०२२ या विषया संदर्भात शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाची अतूट नाते आहे आणि सर्वजण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊन पर्यावरणाचा समतोल राखू आणि भारतीय परंपरेतील सण आणि उत्सव साजरे करू अशा प्रकारची ही शपथ फाटक हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या शपथ देण्याच्या प्रसंगी रत्नागिरी नगरपरिषद व दिव्य स्वप्न फाउंडेशन स्वयंसेवक श्री. शिवराज जाधव, श्री. अभिजीत जाधव तसेच श्री. रेशम जाधव हे उपस्थित होते. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. पाटणकर व पर्यवेक्षक श्री. किर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक श्री. वळवी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिक्षक श्री. अनंत जाधव यांनी ही शपथ विद्यार्थ्यांना दिली.

Previous articleएस टी कर्मचाऱ्यांचे कालपासून बेमुदत उपोषण
Next articleरत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे खास दिवाळी प्रदर्शनाचे उदघाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here