Home Breaking News हिंदू मंदीरे आता सरकारमुक्त होणार?

हिंदू मंदीरे आता सरकारमुक्त होणार?

129

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0024.jpg

पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे:    आता हिंदूंची मंदिरे सरकार मुक्त होणार? पूर्ण देशामध्ये हिंदूंचे मंदिरे ही सरकारच्या ताब्यात आहेत. त्या मंदिरावरती संत,महंत अध्यक्ष,उपाध्यक्ष व ट्रस्टी यांची नियुक्ती ही पूर्णपणे सरकार यांच्या हाती असल्याने त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण वाढत चालला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी हिंदूंची मंदिरे सरकार मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे .त्याची सुरुवात पंढरपूर मंदिरापासून करणार आहे असे त्यांनी सांगितले. खरे पाहिले तर १९६७ साली या लढ्याला सुरुवात झाली. परंतु एक मत नसल्याने सरकारने याला पाठिंबा दिला नाही. १९७३ मध्ये कोर्टाने याला नाम मंजूर केले. पुन्हा २०१४ साली सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले त्यावेळी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने हिंदू मंदिरावरती सरकारी अधिकार राहील असे नमूद केले होते. सुब्रमण्यम स्वामी यांचे मत असे आहे की जर इतर मंदिरे सरकार मुक्त आहेत तर हिंदूंची मंदिरे ही सरकारी नियंत्रणात कशासाठी? जुन्या काळामध्ये सुद्धा संत, महंत मंदिर चालवायचे व तेच दिशा ठरवायचे त्याही काळामध्ये काहीसा भ्रष्टाचार होत असेलही परंतु आता सरकारी नियंत्रण असल्याकारणाने मंदिरावरती ट्रस्टी,अध्यक्ष, उपाध्यक्ष ,कुलगुरू व पुजारी यांची नेमणूक करण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे. आता मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंदिरासाठी नागरिक दान करत असतात व त्याची देखभाल ही पुजारी किंवा इतर ट्रस्टींनी केले पाहिजे ती सर्व आता सरकारच्या ताब्यात आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांनी या लढ्याला सुरुवात केली आहे या लढ्यासाठी सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेने नकार दिला होता. परंतु आता विश्व हिंदू परिषदेने सुब्रमण्यम स्वामी यांना या लढ्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. ही मंदिरे सरकार मुक्त करणार असे त्यांनी ठासून सांगितले त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये हिंदू मंदिरे सरकार मुक्त झाले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. सर्व समाज वर्गांमधून सुद्धा हीच मागणी होत आहे.

Previous articleग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे हर घर तिरंगा जनजागृती मोहिमेस सुरुवात.
Next articleहिंदू मंदीरे आता सरकारमुक्त होणार?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.