Home पुणे कुरियरद्वारे मागविलेल्या 97 तलवारी, 2 कुकरी आणि 9 म्यान पोलिसांच्या ताब्यात दिघीतील...

कुरियरद्वारे मागविलेल्या 97 तलवारी, 2 कुकरी आणि 9 म्यान पोलिसांच्या ताब्यात दिघीतील एका कंपनीच्या गोडाऊनमधून जप्त केला शस्त्रसाठा

94
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220404-WA0086.jpg

कुरियरद्वारे मागविलेल्या 97 तलवारी, 2 कुकरी आणि 9 म्यान पोलिसांच्या ताब्यात
दिघीतील एका कंपनीच्या गोडाऊनमधून जप्त केला शस्त्रसाठा
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी) – उमेश पाटील
दिघीतील ‘डीटीडीसी’ कंपनीच्या गोडाऊनमध्ये कुरीअरमार्फत तब्बल 97 तलवारी 2 कुकरी आणि 9 म्यान मागविण्यात आले. हा शस्त्रसाठा पंजाबमधून औरंगाबात आणि अहमदनगर येथील दोन व्यक्तींनी मागविल्याचे निदर्शनास आले. ही धारदार शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

उमेश सुद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद, महाराष्ट्र), मनींदर (रा. अमृतसर, पंजाब) आणि आकाश पाटील (रा. राहता, अहमदनगर) या चारजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे ‘डीटीडीसी’ कंपनीत 30 मार्च 2022 रोजी अवैध तलवार साठा आढळून आला होता. ‘डीटीडीसी’ कुरीअर कंपनीचे गोडाऊन दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्या दृष्टीने दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी गोडाऊनमध्ये मालाची एक्सरे मशीन द्वारे स्कॅनिंग करण्याची सूचना केली. 1 एप्रिल रोजी गोडाऊनमध्ये दोन लाकडी बॉक्सचे पार्सल आले. यामध्ये 92 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान असा शस्त्रसाठा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही सर्व शस्त्रे जप्त केली आहेत. 03 एप्रिल रोजी आणखी एक बॉक्स आले. यामध्ये पंधरा हजार रुपये किंमतीच्या 05 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. असे दिघी पोलिसांनी एकूण 3 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उपनिरीक्षक भंडारे, पोहवा अमोल जाधव, पोशि शेखर शिंदे, पोशि घुगरे व चालक पोना हेमंत डुंबरे यांनी केली आहे. पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here