• Home
  • ठेंगोडा दरोडा प्रकरणी अद्याप गुन्हेगारांचा तपास नाही.. पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी

ठेंगोडा दरोडा प्रकरणी अद्याप गुन्हेगारांचा तपास नाही.. पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220404-170852_Google.jpg

ठेंगोडा दरोडा प्रकरणी अद्याप
गुन्हेगारांचा तपास नाही.. पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी
(दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
सटाणातालुक्यातील ठेंगोडा गावी पंधरा दिवसापूर्वी पडलेल्या दरोडयाचा तपास लावण्यात व गुन्हेंगार भामटयांना गजाआड करण्यात सटाणा पोलिसांना अद्याप पर्यत यश आलेले नसून तालुक्यातल्या नागरिकातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त होत आहे.
ठेंगोडा येथील धर्मवीर व सामाजिक कार्यकर्त अण्णासाहेब केरुजी पगारे यांचे कुटूंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरटयांनी त्यांच्या बंगल्यात रात्रीच्या सुमारास घुसून लाखो रुपयांच्या रोख रक्कमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला..दिनेश अण्णा पगारे यांनी सटाणा पोलिसात फिर्याद दाखल करुन पंधरा दिवसापेक्षा अधिक कालावधी लोटला गेला तरी सटाणा पोलिस अद्यापही चोरटयांना गजाआड करु शकले नाहीत.हि बाबच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरु लागली आहे,त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील या चोरटयांच्या भितीने धास्तावली आहे.ठेंगोडा दरोडा प्रकरणातील गुन्हेगार चोरटयांना तात्काळ जेरबंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन उद्या दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या माध्यमातून दिले जाणार असल्याची माहिती महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अंकूशजी पवार यांनी दिली आहे.

anews Banner

Leave A Comment