Home पुणे पाटेठाण गावच इतिहासातील अस्तित्व शोधण्यास यश

पाटेठाण गावच इतिहासातील अस्तित्व शोधण्यास यश

172
0

राजेंद्र पाटील राऊत

पाटेठाण गावच इतिहासातील अस्तित्व शोधण्यास यश             दौंड,(आकाश लभड तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज)
इतिहास हा अभ्यास करणाऱ्या लोकांचा आवडता विषय.त्यात आपण राहतो त्या गावचा इतिहास आणि आपल्या कर्मभूमीच इतिहासातील अस्तित्व शोधण्यासाठी इतिहास अभ्यासक नेहमी धडपडत असतात.अशाच धडपडीतून शिरूर-हवेली च्या सीमेवर असलेल्या भीमा नदीतीरावरील दौंड तालुक्याची हद्द असलेल्या पाटेठाण ह्या छोट्याशा गावाच ऐतिहासिक अस्तित्व शोधण्यास यश आलं आहे.पाटेठाण गावचे सुपुत्र आणि इतिहास अभ्यासक मंगेश गणेश गावडे या तरुणाने आपल्या गावाच नाव इतिहासाच्या पानातून शोधून गावाच्या ऐतिहासिक अस्तित्वाचे पुरावे जगासमोर मांडले.
पाटेठाण हे गाव लोकवस्ती आणि क्षेत्रफळाने लहान असल तरी गावाची रचना,गावातील पांढरी (जुन्या वस्तीतील) मध्ये असलेली वाड्याची 10-12फूट उंचीची जोती,गावाच्या जुन्या अवशेषांचे पांढऱ्या मातीतील ढीग,नदीतीरावरील पुरातन यादवीस्थापत्यशैली चे महादेव मंदिर,त्यासमोरील चुन्याची जाती आणि गाड्याची चाक तसेच मंदिरासमोरील विरगळी हे गावातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तू पाहून गावाला इतिहासात नक्कीच महत्वाचं स्थान असेल हे जाणवते पण तसा उल्लेख व पुरावे असल्याशिवाय त्या वस्तुंना व वास्तूंना मान्यता देता येत नाही.ह्या गोष्ठी चा शोध घेत मंगेश नी शोध मोहिमेतून गावाचे इतिहासात असलेले उल्लेख शोधण्यात यश मिळवले.
शके 1699 साली जेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांची सत्ता महाराष्ट्र भर होती तेव्हा त्यांनी पाटेठाण ता.सांडस प्रांत पुणे हा गाव रामचंद्र नारायण यांच्याकडे होता तो राजश्री निळकंठ गोविंद गोसावी यांच्या ताब्यात दिला होता.तशा आशयाच पत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे प्रधान माधवराव नारायण यांच्या शिक्कानिशी आढळून आलं आहे.
श्रीमंत रायरीकर खाजगीवाले यांच्या पत्रव्यवहारांच्या मोडी कागडपत्रानुसार निळकंठ गोसावी यांनी 17व्या शतकाच्या सुमारास पाटेठाण गावच पुरातन श्री नागेश्वर महादेव मंदिर जे जीर्ण होत त्याचा जिर्णोद्दार करून सरकारी शिबंधी साठी एक वाडा आणि पागा बांधल्याचा उल्लेख आढळून आला आहे.
पुढं 1704 मध्ये तुकोजी होळकर यांनीं नीलकंठ गोसावी यांना पत्र पाठवून पाटेठाण गावात व परिसरात जो जकात,धान्य आणि वैरण गोळा केली होती ती त्या काळी असलेल्या मनाचीटी गावात पोहचविण्याची सोय करावी आणि पाटेठाण गावाला कसलाच उपसर्ग म्हणजे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशी ताकीद दिल्याचं एक पत्र सुद्धा मोडीमध्ये आढळून आलं आहे.
जेष्ठ इतिहास तज्ञ राजवाडे यांनी ह्या पत्राची लिप्यांतर करून ठेवली आहेत.भारतीय पुरातन इतिहास मंडळ येथे ही पत्रे पहायला मिळतात.

Previous articleआक्रुतिबंधातील आरक्षणात आदिवासीना राज्य सरकारने डावलले। आदिवासी ला स्वर्गवासी करण्याच्या मानसीकतेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस
Next articleमुखेड शहरात चोरीचे प्रमाण वाढले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here