Home नांदेड मुखेड शहरात चोरीचे प्रमाण वाढले

मुखेड शहरात चोरीचे प्रमाण वाढले

42
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड शहरात चोरीचे प्रमाण वाढले

•] एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरी फुलेनगर , मोंढा भागातील तीन दुकाने , एक घर फोडले ७ ग्राम सोन्यासह २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविले

नांदेड / प्रतिनिधी

मनोज बिराजदार यांचा रिपोर्ट

मुखेड शहरात दि . २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी शहरातील तीन दुकाने व एक घर फोडुन २ लाख ४ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी पळवीला आहे . अन्य दोन ठिकाणी सीसीटीव्हीमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला . याघटनेमुळे शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे . मुखेड शहरातील मोंढा व फुलेनगरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी दुकाने व घर फोडुन धाडसी चोरी केली . या घटनेसंदर्भात फिर्यादी शिवकुमार परमेश्वर कैलासे रा . शिरसी बु . ता . कंधार यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन मुखेड शहरातील मोंढा भागात शिवसाई कृषि सेवा केंद्र असुन दि . २८ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दिवसभरातील झालेल्या खरेदी विक्रीतून गल्यातील रोख १ लाख ८ हजार रुपयाची रक्कम चोरटयांनी पळविली . दुस – या एका घटनेत मोंढा येथील निखिल शिवाजी कदम रा . चिखली ता . कंधार यांच्या क्रांती कृषि विकास केंद्र येथील दुकानाचे शटर तोडून दुकानातील ६४ हजार ७४० रुपये तसेच वैभव गंगाधर शिंदे रा . केरुर ता . मुखेड यांच्या मोंढा भागातील गोपाळ ट्रेडींग भुसार दुकानाचे कुलुप तोडून गल्यातील २ हजार रुपये पळविले आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथे दोन दि . २४ फेब्रुवारीच्या रात्री ५० हजार रोख ८ सोने ग्रॅम सोने चोरी झाल्याची घटना घडली होती . ही घटना ताजी असतानाच पुन्हा दि . २८ फेब्रुवारीच्या रात्री मुखेड शहरात चार ठिकाणी धाडसी चोरी झाल्याची घटना घडली . यामुळे नागरीकांसह व्यापा – यात भितीचे वातावरण असुन तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . . तसे फुलेनगर भागातील राजु सुरेश रनभिडकर यांच्या बंद घराचे कुलुप तोडून ७ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख १५ हजार रुपये लंपास केले असे एकून चार ठिकाणी झालेल्या धाडसी चोरीत ७ ग्राम सोने व २ लाख ४ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल पळविला . याप्रकरणी पोलिसाना घटना कळताच पोलिस निरीक्षक विलास गोबाडे , पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे , पोलिस जमादार पंडीत राठोड , पोलिस कर्मचारी सिध्दार्थ वाघमारे , सचिन मुत्तेपवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन फिर्यादीने दिलेल्या फिर्यादिनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध मुखेड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास पोलिस उपनिरिक्षक गजानन काळे करीत आहेत .

Previous articleपाटेठाण गावच इतिहासातील अस्तित्व शोधण्यास यश
Next articleयेवती येथे प्रवाशी निवारा उभारण्याची मागणी  
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here