Home Breaking News 🛑 *पारनेरमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव* 🛑

🛑 *पारनेरमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव* 🛑

103
0

🛑 *पारनेरमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव* 🛑
✍️ अहमदनगर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर :-⭕कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण होईल असे वाटत होते.

परंतु काल पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या लिलावात कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रूपयांपर्यंत भाव मिळाला असल्याची माहिती सभापती प्रशांत गायकवाड व उपसभापती विलास झावरे यांनी दिली आहे. रविवारच्या कांदा लिलावात एक नंबरच्या कांद्याला ४४०० ते ५१०० दोन नंबरच्या कांद्याला ३४०० ते ४३०० तीन नंबरच्या कांद्याला २२०० ते ३३०० रूपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

कांद्याला गेल्या काही दिवसांपासून बाजार भाव मिळत नव्हता, मात्र गेल्या दोन आठवड्यापासून बाजार भाव वाढण्यास सुरुवात झाली होती पण केंद्राने तातडीने निर्यात बंदीचा आदेश जाहीर केल्याने पुन्हा कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली होती. परंतु काल पारनेर बाजार समितीतीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अनेक राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव कोसळले होते. मात्र पावसामुळे इतर राज्यात कांदा खराब झाल्याने आपल्याकडील कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी मागे घ्यावी अशी मागणी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केली आहे…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here