Home Breaking News *रुग्णवाहिकेसाठी 15 लाखांचा निधी मंजूर माजी.मुख्यमंत्री.पृथ्वीराज चव्हाण*

*रुग्णवाहिकेसाठी 15 लाखांचा निधी मंजूर माजी.मुख्यमंत्री.पृथ्वीराज चव्हाण*

133
0

*रुग्णवाहिकेसाठी 15 लाखांचा निधी मंजूर माजी.मुख्यमंत्री.पृथ्वीराज चव्हाण*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

मलकापूर ता.कराड मध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता शहरासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची आवश्यकता होती . तालुक्याचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका मिळण्याबाबत केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिऱ्यांनी 15 लाख निधी मंजूर केला होता . त्या निधीतून अत्याधुनिक रुग्णवाहिका पालिकेच्या सेवेत दाखल झाली . त्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाले . सध्या कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे . बाधित रुग्णांना वेळेत उपचार करणे आवश्यक असल्यामुळे अशा रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणेसाठी रुग्णवाहिकांची गरज होती . सध्या शहरात उपलब्ध रुग्णवाहिकांवरील ताण विचारात घेता मलकापूरसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची आवश्यकता होती . ही गरज ओळखून पालिकेने रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून 15 लाखांचा निधी मिळण्याची विनंती केली होती . आमदार चव्हाण यांनी 21 ऑगस्टला रुग्णवाहिकेसाठी निधी मंजूर करण्याकरिता शिफारस केली होती . त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 15 लाखांच्या निधीस तातडीने मान्यता दिली . त्याची अंमलबजावणी होऊन ही रुग्णवाहिका पालिकेच्या सेवेत समाविष्ठ झाली . त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात नेण्याकरिता सोय उपलब्ध झाली आहे . त्या सर्व सोयींनीयुक्त रुग्णवाहिकेचे माजी. मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . आमदार चव्हाण यांनी रुग्णवाहिकेची चावी नगराध्यक्षा सौ.नीलम येडगे व प्रभारी मुख्याधिकारी सौ.मनीषा आव्हाळे यांच्याकडे दिली .तसेच कोयना वसाहत औद्योगिक वसाहतीमधील व्यावसायिकांकडून चार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पालिकेला देण्यात आल्या .
आमदार चव्हाण यांनी 21 ऑगस्टला रुग्णवाहिकेसाठी निधी मंजूर करण्याकरिता शिफारस केली होती .त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 15 लाखांच्या निधीस तातडीने मान्यता दिली . त्याची अंमलबजावणी होऊन ही रुग्णवाहिका पालिकेच्या सेवेत समाविष्ठ झाली . त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांना वेळेत उपचारासाठी दवाखान्यात नेण्याकरिता सोय उपलब्ध झाली आहे.
आमदार चव्हाण यांनी रुग्णवाहिकेची चावी नगराध्यक्षा नीलम येडगे व प्रभारी मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे दिली .
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे , तहसीलदार अमरदीप वाकडे , उपाध्यक्ष मनोहर शिंदे , इंद्रजित चव्हाण , बांधकाम सभापती राजेंद्र यादव , सागर जाधव , महिला व बालकल्याण सभापती आनंदी शिंदे , उपसभापती कमल कुराडे , नगरसेविका शकुंतला शिंगण , माधुरी पवार , नंदा भोसले , आनंदराव सुतार , हणमंत शिंगण , गणेश चव्हाण , शहाजी पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . पालिकेला आणखी चार ऑक्सिजन मशिन यावेळी केएसटी कन्स्ट्रक्शनचे संचालक किशोरकुमार साळुखे , अरविंद खबाले , जीवन तवटे उपस्थित होते.

Previous article*मराठा समाज्याच्या वतीने* *समाजजागृती मोहीम ,* *एकच ध्येय मराठा आरक्षण.*
Next article🛑 *पारनेरमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here